राज्यपाल नियुक्त 12 नावं फडणवीस आणि राज्यपाल बाजूला काढतील, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा गंभीर आरोप

राज्यपाल नियुक्त 12 नावं फडणवीस आणि राज्यपाल बाजूला काढतील, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा गंभीर आरोप

हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा दाखल देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 02 नोव्हेंबर : राज्यपाल नियुक्त आमदारांची (Governor-appointed MLA) नाव आता जवळपास निश्चित झाली आहे. लवकरच 12 जणांची यादी ही राज्यपालांकडे सोपण्यात येणार आहे. परंतु, 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राज्यपाल (governor bhagat singh koshyari) यांनी विधान परिषदेची 12 आमदारांची नावं बाजूला काढण्याचे ठरवले आहे', असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा दाखल देत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

आमदार विनय कोरे यांच्या घरी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना चंद्रकांत पाटील यांनी, 'महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त आमदारांची नाव निश्चित केली आहे. त्याची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे. पण, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांनी ही नावे बाजूला करण्याचे आधीच ठरवले आहे' असं वक्तव्य केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

फुकट्या 'भाई'ची दिवाळी खरेदी, दुकानात घुसून लुटले 20 हजाराचे कपडे, VIDEO

विनायक कोरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या गप्पा सुरू होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. या दोन्ही कार्यकर्त्यांनी मास्क लावलेला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी त्यांना ओळखलं नाही, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

महाराष्ट्र राज्य शरद पवारांना चालवायला दिले आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता, या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले की, 'पवार साहेब हे सर्वात वरिष्ठ नेते आहेत. त्यांना सगळ्या प्रश्नांची जाण आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही शरद पवारांना भेटत असायचे. शरद पवार हे जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन प्रश्नांची सोडवणूक करतात. ते महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत.'

तर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांच्या आरोपाबद्दल विचारले असताना चंद्रकांत पाटील यांनी बोलण्याचे टाळले.  'राज्यपालपदाचा मी मान राखतो, त्यामुळे या विषयावर बोलणार नाही' असं पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यादी राज्यपालांकडे देणार

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत कुणाचे नाव वर्णी लागावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात 12 नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे.

ब्राझीलमध्ये चिनी लशीविरोधात एल्गार; 300 नागरिक उतरले रस्त्यावर

काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. पण, या शर्यतीतून अचानक त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, तशी शक्यताही नाकारण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव पुढे आले  तर काँग्रेसमधून अभिनेत्री रेणुका शहाणे यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. पण, संभाव्य उमेदवारींची यादी आता पूर्ण झाली असून चर्चेतील नावांना वगळण्यात आले आहे.

अखेर ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ही यादी तयार केली आहे.

Published by: sachin Salve
First published: November 2, 2020, 1:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या