मुंबई 23 डिसेंबर : झारखंडमधल्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे येत असला तरी सत्ता हातातून जाण्याची शक्यता आहे. जेएमएम आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेच्या जवळ जाताना दिसून येतेय त्यामुळे हे राज्यही भाजपच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर झारखंड हा भाजपला दुसरा मोठा धक्का असेल. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झारखंडमधल्या निकालांवरून भाजपवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही त्यांना सत्ता राखता आली नाही. शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. भाजपविरोधात सगळे पक्ष एकत्र आलेत. महाराष्ट्रातल्या या प्रयोगाची देशभर चर्चा होतेय. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. रोहित पवार म्हणाले, झारखंड निवडणुकांमध्ये क्राँगेस व मित्रपक्ष आघाडीवर असल्याची बातमी आहे. जसे महाराष्ट्रात चित्र बदललं त्याचप्रमाणे झारखंडचे चित्र असेल. कुठेतरी महाराष्ट्राने केलेली ही सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात देखील दिसेल. झारखंडमधील काँग्रेस व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. राष्ट्रवादीसाठी झारखंडमधून आनंदाची बातमी, विधानसभेत घड्याळाची टिकटिक 2014मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केली होती. त्यानंतर एक एक राज्य मिळवत बहुसंख्य राज्यात सत्ता मिळवली होती. मात्र प्रत्येक वेळी राजकारणात विजय मिळतोच असं नाही. त्यानंतर आता अनेक राज्य भाजपच्या हातातून जात आहेत त्यामुळे भाजपवर टीका करण्याची संधी रोहित पवारांनी सोडली नाही.
झारखंड निवडणुकांमध्ये काॅंगेस व मित्रपक्ष आघाडीवर असल्याची बातमी आहे.जसे महाराष्ट्रात चित्र बदललं त्याचप्रमाणे झारखंडचे चित्र असेल. कुठेतरी महाराष्ट्राने केलेली ही सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात देखील दिसेल. झारखंडमधील काॅंग्रेस व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. pic.twitter.com/F5syEYoRa8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2019
झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या युतीने भाजपला मागे टाकलं आहे. त्यामुळे झारखंड हेही भाजपच्या हातातून जाण्याची चिन्हं आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांपाठोपाठ हे राज्यही भाजपच्या हातातून निसटताना दिसतंय.
‘तिथं पण कोण उभं करणार नाही’. ठाकरेंवरील टीकेनंतर अमृता फडणवीसांवर सेनेचा पलटवार
निम्म्या भागात गेली सत्ता डिसेंबर 2017 चं चित्र पाहिलं तर देशभरात 71 टक्के भागात भाजपची सत्ता होती. झारखंडच्या निवडणूक निकालानंतर डिसेंबर 2019 चं चित्र पाहिलं तर फक्त 35 टक्के भागात भाजपची सत्ता आहे. 2017 मध्ये भाजपशासित राज्यांमध्ये 68 टक्के लोकसंख्या होती. म्हणजेच देशाची जेवढी लोकसंख्या होती तेवढ्या टक्केवारीच्या भागात भाजपचं राज्य होतं. आता 2019 मध्ये भाजपच्या हातात देशाची 43 टक्के लोकसंख्या राहील. 2014 मध्ये भाजपकडे 7 राज्यं होती. 2018 मध्ये या राज्यांची संख्या 19 झाली. म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्षांची 19 राज्यांत सत्ता आहे.

)







