मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली अँजिओग्राफी चाचणी

जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली अँजिओग्राफी चाचणी

Jayant patil health update : जयंत पाटील सध्या मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.  आता त्यांच्या प्रकृतीविषयी  अपडेट समोर आली आहे.

Jayant patil health update : जयंत पाटील सध्या मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आता त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर आली आहे.

Jayant patil health update : जयंत पाटील सध्या मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आता त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर आली आहे.

मुंबई, 29 जुलै: बुधवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) दाखल करण्यात आलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता त्यांच्या प्रकृतीविषयी (Health Update) अपडेट समोर आली आहे.

जयंत पाटील यांची आता अँजिओग्राफी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑपरेशन करण्याची आवश्यकता नसल्याचंही समजतंय.

स्वतः जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपल्या प्रकृती संदर्भातली माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट केलं की, आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती मी आपला आभारी आहे.

काल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही.' अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करून दिली होती.

'आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल' असं जयंत पाटील म्हणाले.

राज्यात आलेल्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत जयंत पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते या बैठकीतून बाहेर पडले. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दर वाढले, जाणून घ्या नवे दर

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे बाजूलाच असलेल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांची ईसीजे करण्यात आला आहे. ह्रदयाची काय परिस्थिती आहे, त्यानुसार, तपासणी केली जाणार आहे. जर गरज पडल्यास सकाळी अँजिओप्लास्टी सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Jayant patil, Maharashtra, Mumbai, NCP