जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Politics : अजितदादा अजूनही वेटिंगवर; मुश्रीफ आणि भुजबळांसह 8 जणांना मंत्रालयात मिळाले दालन!

Maharashtra Politics : अजितदादा अजूनही वेटिंगवर; मुश्रीफ आणि भुजबळांसह 8 जणांना मंत्रालयात मिळाले दालन!

(मंत्रालय)

(मंत्रालय)

Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाते मिळणार याबद्दल अजून निर्णय बाकी आहे. पण त्याआधी राष्ट्रवादीच्या 8 ही मंत्र्यांना मंत्रालयात दालन वाटप करण्यात आले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 11 जुलै : शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या 8 आमदारांसह सहभागी झाले आहे. अजित पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाते मिळणार याबद्दल अजून निर्णय बाकी आहे. पण त्याआधी राष्ट्रवादीच्या 8 ही मंत्र्यांना मंत्रालयात दालन वाटप करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार यांच्याबद्दल अजूनही निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. अजित पवारांसह त्यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेवून आठवडा उलटला आहे. पण, या मंत्र्यांच्या खातेवाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं, पण त्यांना कुठलं खातं मिळणार यापेक्षा जास्त अजित पवार मंत्रालयात कुठे बसणार? त्यांचं कार्यालय सहाव्या मजल्यावर कार्यालय मिळणार की दुसऱ्या कुठल्या मजल्यावर? याबाबत आता शासन आणि प्रशासनाकडून चर्चा सुरू आहे. अशातच इतर मंत्र्यांना मंत्रालयामध्ये दालन वाटप करण्यात आले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

असं आहे नव्या मंत्र्यांची मंत्रालयात दालनं छगन भुजबळ - २०१ नंबर दालन दुसरा मजला हसन मुश्रीफ - ४०७ नंबरचे दालन, ४ मजला दिलिप वळसे पाटील - ३०३ नंबर दालन, तिसरा मजला धनंजय मुंडे - २०१ ते २०४ आणि २१२ नंबरचे दालन, दुसरा मजला धर्मराव बाबा आत्राम, ६०१, ६०२ व ६०४, सहावा मजला आदिती तटकरे, दालन नंबर १०३, मुख्य इमारत अनिल पाटील - दालन नंबर ४०१, ४ मजला, मुख्य मंत्रालय इमारत संजय बनसोडे, दालन नंबर ३०१ , मुख्य मंत्रालय इमारत दरम्यान, अजित पवार यांना सहाव्या मजल्यावर दालन मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात खातं जेवढं महत्वाचं, तेवढंच सहाव्या मजल्यावर कार्यालयही.. पण, सध्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे कार्यालयं आहेत. त्यामुळे अजित पवारांचं कार्यालय कुठे असेल? याचीच सर्वांना उत्सुकता आहे. (Maharashtra Politcs : भुजबळांसह अजितदादांनाही जीवे मारण्याची धमकी, आरोपीचा धक्कादायक खुलासा) सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कार्यालयं असल्यानं, सध्या तरी अजित पवारांकरिता सहाव्या मजल्यावर कार्यालयाचा जागा नाही. त्यामुळे अजित पवारांकरिता सहाव्या मजल्यावर कार्यालय तयार केले जाते की इतर मजल्यावर जागा दिली जाते? याबाबत सामान्य प्रशासन विभागासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांची चर्चा करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai , NCP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात