• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • जयंत पाटलांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल केला वेगळाच दावा

जयंत पाटलांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल केला वेगळाच दावा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (Jayant Patil Reaction On Anil Deshmukh) यांनी वेगळाच दावा केला आहे.

  • Share this:
मुंबई, 15 मार्च : एपीआय सचिन वाझे हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तसंच या पार्श्वभूमीवर पुढील काळामध्ये राज्य मंत्रिमंडळात काही फेरबदल होतील, असं बोललं जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (Jayant Patil Reaction On Anil Deshmukh) यांनी वेगळाच दावा केला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करणार नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नाही,' अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. 'हे प्रकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख योग्य पद्धतीने हाताळत आहेत. आम्ही कोणालाही पाठीशी घातले नाही. आधी एटीएस या प्रकरणात चौकशी करत होतं. आता केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. त्यामुळे तुर्तास तरी मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे. हेही वाचा - शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं ठरलं, 'या' तारखेला मंत्रिमंडळात करणार फेरबदल! राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांशी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चा (Sharad Pawar Calls NCP Meeting) करणार आहेत. या बैठकीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत दिले होते. मात्र जयंत पाटील यांनी ही चर्चा खोडून काढल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. फेरबदल झाल्यास राष्ट्रवादी कोणाला देणार संधी? अनिल देशमुख यांना बाजूला सारत गृहमंत्रिपदी राष्ट्रवादीतीलच एका दिग्गज नेत्याला संधी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून दोन नावांचा मुख्यत्वे विचार होत असल्याची माहिती आहे. 'वाझे प्रकरणामुळे सरकारची अडचण झालेली असताना डॅमेज कण्ट्रोलसाठी गृहमंत्रिपदी आता दुसऱ्या नेत्याची निवड होऊ शकते. यामध्ये सध्या अजित पवार आणि जयंत पाटील (Ajit Pawar and Jayant Patil in Home Minister Race) यांची नावं आघाडीवर आहेत,' अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: