मुंबई, 08 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा 12 डिसेंबरला 80 वा वाढदिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 80 हजार तरुणांना रोजगार देणार अशी घोषणाच राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 80 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. Farmer Protest मुळे शाहिदच्या चित्रपटाचं काम थांबवलं दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोकं नोंदणी करू शकतात. तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जिल्हा स्तरावर नोंदणी करण्याचा उपक्रम राबविणार आहेत. त्यानंतर 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जातील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 7 डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी 214 कंपन्यांनी उपक्रमामध्ये नोंदणी केली आहे. 80 हजार तरुणांना रोजगार दिला जाईलच. पण हा आकडा आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. कारण, कंपन्यांची मागणी अधिक असल्यामुळे हा आकडा एक लाखाच्यावरही जाऊ शकतो, असंही मलिक यांनी सांगितले. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून रक्तदान शिबिरे’ दरम्यान, राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिरं घेण्यासंदर्भात जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून या रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. ‘राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या शिल्लक असून रक्तदान वाढवणं गरजेचं असल्याचं देखील टोपे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.