मुंबई, 14 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत आता पुन्हा एकदा एनसीबीवर (Nawab Malik attack on NCB) निशाणा साधला आहे. आपल्या जावयाला विनाकारण ड्रग्ज प्रकरणात गोवलं गेल्याचा दावाही यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे. माझा जावई समीर खान ड्रग्ज पेडलर असल्याचं सांगत बातम्या पेरण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिकांचा जावई ड्रग्ज पेडलर (drug peddler) असल्याचं भाजप नेते म्हणतात. राष्ट्रवादीला (NCP) बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनसीबीने मलिकांचे जावई समीर खान (Sameer Khan) ड्रग्ज पेडलर असल्याचं सांगून बातम्या पेरण्यात आल्या. या प्रकऱणात जावयाला अडकवण्यात आलं. जावई साडे आठ महिने कारागृहात होता. कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याचा बातम्या खोट्या
एनसीबीने केलेल्या कारवाई दरम्यान 200 किलो गांजा सापडला असं सांगण्यात आलं होतं. पण गांजा सापडलाच नाही तर हर्बल तंबाखू असल्याचं अहवालात नमूद आहे. जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याचा बातम्या खोट्या आहेत. एनसीबीला गांजा आणि तंबाखू यामधला फरक ओळखता येत नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनसीबीनं सजलानींसह अनेकांना विनाकारण गोवलं गेलं आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
कुटुंबाला मोठा मानसिक धक्का
नवाब मलिक म्हणाले, 6 तारखेला पत्रकार परिषद घेत मी एनसीबीच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी माझ्या जावायवर भाजपने प्रश्न उपस्थित केले. 13 जानेवारीला समीर खानला अटक झाली होती. भाजपचे नेते नवाब मलिक यांचा जावई ड्रग डीलर आहे असे सांगत बदनामी करत होते. 27 तारखेला कोर्टाने करण सजदानी आणि राहीला फर्निचरवाला यांना साडेआठ महिन्यांनी जामीन दिला. त्याची लेखी ऑर्डर काल ऑनलाईन लोड करण्यात आली ती आम्ही वाचून पहिली. माझ्या घरातले बाहेर पडत नाही, मानसिक आघात झाला आहे.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 14, 2021
वाचा : Drug Case: भाजप नेत्याच्या मेहुण्याला NCB नं सोडलं?, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
नवाब मलिक म्हणाले, 8 जानेवारीला पत्रकारांना एनसीबीने सांगितलं की, शिलॉंगसाठी करण सजदानी यांनी एक पार्सल पाठवलं. 9 जानेवारीला करणच्या घरी रेड टाकली आणि 200 किलो गांजा जप्त केला अशी प्रेस रिलीज काढण्यात आली आणि 4 फोटो देण्यात आले. एका नंबरने व्हॉट्सअपवरुन अनेकांना मेसेज करण्यात आले. त्याखाली समीनर वानखेडे यांचं नाव होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तरप्रदेशात छापा टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 9 जानेवारीला एका मुलीकडून 7.50 ग्राम गांजा जप्त करण्यात आलं आणि तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. त्याच दिवशी रॉईस पान गुडगाव, जितू हर्बल टोबॅक, मुच्छड पानवाला असे अनेक छापे टाकण्यात आले. उत्तरप्रदेशातील रामपूर येथे छापा टाकला आणि त्याची माहिती मीडियाला दिली.
वाचा : आर्यनची अटक बनावट, महिन्याभरापासून शाहरुख खान होता टार्गेट, मलिकांचा आरोप
13 जानेवरीला सकाळी एका पत्रकाराचा मला फोन आला आणि त्याने माझ्या जावयाला समन्स दिला का हे विचारलं. 12 तारखेला रात्री 10 वाजता समन्स मिळाला आणि 13 तारखेला समीर एनसीबी कार्यालयात सकाळी पोहोचला. त्याच दिवशी वरच्या नंबरवरून मेसेज गेले की 27 a अंतर्गत समीर खानला अटक करण्यात आली. त्याच दिवशी आम्ही कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि साडेतीन महिने एनसीबीने टाळाटाळ केली. पण शेवटी 12 ऑक्टोबरला जामीन मिळाला आणि 13 तारखेला रात्री ऑर्डर लोड झाली. एनसीबी एव्हढी मोठी तपास यंत्रणा आहे तरीही त्यांच्याकडे तंबाखू आणि गांजामधील फरक दाखावणारी यंत्रणा नाही का? 14 तारखेला माझ्या मुलीच्या घरी रेड साठी गेले आणि सर्व चॅनेलवर मोठ्या प्रमाणात गांजा सापडला अशी बातमी लिक करण्यात आली असंही नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले, कारवाई केल्यावर घटनास्थळावर आढळलेला मुद्देमाल जप्त करण्यात येतो. सीझर तिथं केलं जातं आणि कोर्टासमोर उघडलं जात. मात्र, एनसीबीने पत्रकारांना पाठवलेल्या फोटोजमध्ये सीज केलं नसल्याचं दिसत आहे आणि आम्ही हेच कोर्टाला सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Nawab malik, NCB