मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पाकिस्तान टीममध्ये 3 बदल, भारताची डोकेदुखी वाढणार?

T20 World Cup: पाकिस्तान टीममध्ये 3 बदल, भारताची डोकेदुखी वाढणार?

पाकिस्ताननं टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडलेल्या टीममध्ये 3 बदल केले आहेत. टीममध्ये बदल करण्यासाठी आयसीसीनं (ICC) दिलेली मुदत संपत आलेली असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) ही घोषणा केली आहे.

    मुंबई, 9 ऑक्टोबर: संपूर्ण क्रिकेट विश्व सध्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) मग्न आहे. आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून आठवभरात या सिझनचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी टी20 वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन (ICC T20 World Cup 2021) देखील सुरू झालं आहे. पाकिस्ताननं या वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये 3 बदल केले आहेत. टीममध्ये बदल करण्यासाठी आयसीसीनं (ICC) दिलेली मुदत संपत आलेली असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) ही घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या 15 सदस्यीय  टीममध्ये माजी कॅप्टन सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmed) ओपनर फखर जमां (Sarfaraz Ahmed) आणि  हैदर अली (Haider Ali) यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी निवडण्यात आलेल्या टीममधील आझम खान (Azam Khan) आणि फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन यांना वगळण्यात आले असून खुशदील शाहचा आता राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पाकिस्तान टीमच्या निवडीवर जोरदार टीका झाली होती. या टीमची निवड झाल्यानंतर काही तासांमध्येच हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस यांनी राजीनामा दिला होता. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पाकिस्तान बोर्डानं हे बदल केले आहेत. आयसीसीनं सर्व टीमनं बदल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. BCCI नं मदत थांबवली तर पाकिस्तान क्रिकेटचं दिवाळं वाजेल! PCB अध्यक्षांची कबुली पाकिस्तानची या वर्ल्ड कपमधील पहिली लढत 24 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला हरवणाऱ्या टीमचा सर्फराज कॅप्टन होता. तर फखर जमांनं त्या मॅचमध्ये शतक झळकावले होते. भारताला या स्पर्धेत हरवल्यास खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी कोरा चेक तयार असल्याची घोषणा पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी केली आहे. T20 World Cup पूर्वीच पाकचे डावपेच सुरू; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा पाकिस्तानची टीम : बाबर आझम (कप्तान), शादाब खान (उप-कप्तान), आसिफ अली, फखर जमां, हैदर अली, हॅरीस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (विकेटकीपर) ), शाहीन शाह अफरीदी, सोहेब मकसूद. राखीव खेळाडू : खुशदिल शाह, शाहनवाज दहानी और उस्मान कादीर
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Pakistan Cricket Board, T20 world cup

    पुढील बातम्या