मुंबई, 11 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सातत्याने एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. तर भाजपकडूनही नवाब मलिकांना प्रत्युत्तर देत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर हिने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर (Nawab Malik daughter Nilofer) आणि मलिकांच्या जावयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik's son-in-law sends legal notice to former chief minister and BJP leader Devendra Fadnavis for "defamatory and false allegations against him and demands Rs 5 Cr on account of mental torture, agony and financial loss."
— ANI (@ANI) November 11, 2021
या संदर्भात नवाब मलिक म्हणाले, माझ्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडले असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र, जावयाच्या घरात कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नव्हतं. पंचनाम्यातही तसंच म्हटलं आहे तरी सुद्धा फडणवीस ड्रग्ज सापडल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे माझ्या मुलीने त्यांना नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार.
नवाब मलिकांच्या लढ्याला राज्य सरकारचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य मंत्रीमंडळानं मलिकांना जाहीर पाठिंबा देतानाच हा लढा सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या लढ्याला मोठं राजकीय पाठबळ मिळाल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर कौतुक केलं. Good Going नवाब मलिकजी, असं म्हणत त्यांनी आपला हा लढा सुरूच ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांना केलं. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मलिक यांचं कौतुकही केलं. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक विरुद्ध एनसीबी आणि त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढाई महाराष्ट्रात रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आऱोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळानं नवाब मलिक यांना जाहीर केलेला पाठिंबा ही मोठी राजकीय घडामोड ठरते आहे.