मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नवाब मलिकांच्या लढ्याला राज्य सरकारचा पाठिंबा, मुख्यमंत्री म्हणाले GOOD GOING!

नवाब मलिकांच्या लढ्याला राज्य सरकारचा पाठिंबा, मुख्यमंत्री म्हणाले GOOD GOING!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं (State cabinet along with CM extends support to Nawab Malik) आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं (State cabinet along with CM extends support to Nawab Malik) आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं (State cabinet along with CM extends support to Nawab Malik) आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं (State cabinet along with CM extends support to Nawab Malik) आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य मंत्रीमंडळानं मलिकांना जाहीर पाठिंबा देतानाच हा लढा सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या (Political support to Nawab Malik) लढ्याला मोठं राजकीय पाठबळ मिळाल्याचं मानलं जात आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर कौतुक केलं. Good Going नवाब मलिकजी, असं म्हणत त्यांनी आपला हा लढा सुरूच ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांना केलं. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मलिक यांचं कौतुकही केलं. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक विरुद्ध एनसीबी आणि त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढाई महाराष्ट्रात रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आऱोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळानं नवाब मलिक यांना जाहीर केलेला पाठिंबा ही मोठी राजकीय घडामोड ठरते आहे.

संघर्ष कडवट होण्याची शक्यता

सुरुवातीला केवळ आर्यन खान आणि क्रूझ ड्रग प्रकरणापुरता मर्यादित असलेला हा संघर्ष आता वेगळं वळण घेत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. आर्यन खान जामीन मिळाल्यानंतर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून हे प्रकरण काढून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आता नवाब मलिकांनी आपला मोर्चा देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडे वळवल्याचं चित्र आहे. मलिकांना उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात दाउदशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणं 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी जमीन खरेदी केल्याचा दावाही केला होता. तर या दाव्याला वेगळी पत्रकार परिषद घेत मलिकांनी उत्तर दिलं होतं आणि फडणवीसांवर नव्या आरोपांचं सत्र कायम ठेवलं होतं.

दरम्यान, नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या सर्व आरोपांची कागदपत्रं प्रतिज्ञापत्रासह सादर करावीत, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तर त्यापाठोपाठ आता राज्य मंत्रीमंडळाने नवाब मलिक यांना पाठिंबा दिला आहे. आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.

First published:
top videos

    Tags: Nawab malik, State government, Uddhav Thackeray (Politician)