मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण, शहा आणि फडणवीस यांच्या भेटीच्या फोटो मार्फ करून शरद पवार सुद्धा बैठकीला हजर असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. राष्ट्रवादीने यावर आक्षेप हा फोटो बनावट असून फोटोशॉप केला असल्याचं उघड केलं आहे.
आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो समोर आला. पण, अचानक एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थितीत होते, असं या फोटोतून दाखवण्यात आलं.
अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मॉफ़् केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉफ़् ला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. @MahaCyber1 असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.@maharashtra_hmo pic.twitter.com/wo4t3YdeXI
— NCP (@NCPspeaks) November 26, 2021
पण, राष्ट्रवादीने या फोटोचा पर्दाफाश केला आहे. 'अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मार्फ केलेले बचकांडे हातखंडे आहे, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन
'आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर पोलीस असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे' अशी विनंती सुद्धा राष्ट्रवादीने सायबर पोलिसांकडे केली आहे.
संघटनात्मक बदल होणार नाही - फडणवीस
दरम्यान, आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत बऱ्यात घडामोडी घडल्यात. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
'अमित शहा हे आमचे नेते आहे. त्यामुळे दिल्लीत आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतच असतो. त्यामुळे कुठलाही संघटनेमध्ये बदल नाही, मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक झाली, असं फडणवीस यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.