मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आघाडी सरकार झोपेत निर्णय घेत नाही, तुम्ही स्वप्नातच आनंद घ्या, मलिकांचे चंद्रकांत पाटलांना प्रतयुत्तर

आघाडी सरकार झोपेत निर्णय घेत नाही, तुम्ही स्वप्नातच आनंद घ्या, मलिकांचे चंद्रकांत पाटलांना प्रतयुत्तर

Nawab Malik vs Chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सरकार पडण्याबाबत आणखी एक वक्तव्य केलं. सगळे झोपे असतानाच सरकार पडेल. कुणाला कळणारही नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्य सरकार जसं कधी आलं ते कुणालं कळलं नाही तसं ते गेलं कसं हेही कुणालाकळणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 मे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारबाबत (Maharashtra Government) नवं भाकीत केलं आहे. महाराष्ट्र झोपेत असनाच महाविकास आघाडीचं हे सरकार पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यानंतर आता यावरूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब पाटील (Nawab Malik) यांनी महाविकास आघाडी सरकार झोपेत निर्णय घेत नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. तसंच सरकार पडणार नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

(वाचा-भारतीय कर्मचाऱ्यांबाबत चिंता,Twitterच्या ऑफिसवर छापेमारीनंतर कंपनीची प्रतिक्रिया)

चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सरकार पडण्याबाबत आणखी एक वक्तव्य केलं. सगळे झोपे असतानाच सरकार पडेल. कुणाला कळणारही नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्य सरकार जसं कधी आलं ते कुणालं कळलं नाही तसं ते गेलं कसं हेही कुणालाकळणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या मिळालेला सत्तेचा काळ हा बोनस आहे. त्यांनी स्वतःच काही दिवसांपूर्वीच सरकार जाणार असल्याची मनाची तयारी करून घेतली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

(वाचा-संजय राऊत, तुमचे मालक घरात 5 तास कशासाठी महायज्ञ करतायेत? नितेश राणेंचा सवाल)

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला नवाब मलिक यांनी लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा रात्री स्वप्न बघतात आणि सकाळी बोलतात. त्यांना त्या स्वप्नात आनंद भेटत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. सगळे झोपेत असताना सरकार पडेल या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. सगळी जनता झोपलेली असताना महाविकास आघाडीचं सरकार निर्णय घेत नाही, तर लोकांच्या समोर हे सरकार निर्णय घेतं असी टीका मलिक यांनीव केली.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, आघाडी सरकार एकजुटीनं काम करतंय. 'ऑपरेशन लोटस' केलं पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. पण ते शक्य होत नाही. काहींना सरकार येईल अशी स्वप्नं पडत आहेत. मात्र हे आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. पण तेवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणं 25 वर्ष टिकेल. त्यामुळं 25 वर्ष स्वप्न बघतच राहा असा सल्लाही नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडण्याच्या चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून या ना त्या कारणानं याचा उल्लेख होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार पडणारचं या विरोधकांच्या दाव्याला सरकारचा पाच वर्षेच काय 25 वर्ष सत्ते राहण्याच्या दाव्यानं उत्तर देण्यात आलंय. त्यामुळं आता नेमकं काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil, Maharashtra, Mumbai, Nawab malik