नवी मुंबई, 18 एप्रिल : कोरोनामुळे (Corona) होणाऱ्या मृतांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं नवी मुंबईत (Navi mumbai) पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा आकडा कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं (navi mumbai municipal corporation ) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळं होणाऱ्या मृतांमधील ज्येष्ठांचं प्रमाण पाहता 50 वर्षांच्या पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं अशा नागरिकांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती व्हावं लागणार आहे.
कोरोनाचे आकडे हे रोज मोठ्या संख्येनं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि त्याचबरोबर मृतांचे आकडेही प्रचंड वाढत आहेत. संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती आहे. नवी मुंबईतही कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र कोरोना रुग्णांच्या आकड्यांपेक्षा नवी मुंबई महानगर पालिकेसाठी चिंचेता विषय बनला आहे याठिकाणचा मृत्यू दर.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नवी मुंबईत वाढलं आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आता मनपानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत होत असलेल्या मृत्यूचा विचार केला असता याठिकाणी होणाऱ्या एकूण मृत्यूपेक्षा 80 टक्के मृत्यू हे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे आहेत. त्यामुळं या दृष्टीनं महापालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
(वाचा-बेड मिळाला नाही म्हणून बस स्थानकावर थांबले अन् पत्नीच्या उशालाच पतीने प्राण सोडले)
50 पेक्षा अधिक वय असल्यास घरी उपचार नाही
नवी मुंबई महानगर पालिकेने केलेल्या या निर्णयानुसार ज्या नागरिकांचं वय 50 वर्षांपेक्षा अधिक असेल त्यांना होम आयसोलेशनमध्ये म्हणजे घरी राहून उपचार घेण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा नागरिकांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे असे निर्देश देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक घरी उपचार घेत असल्यानं अचानक प्रकृती गंभीर होते आणि नंतर उपचाराला उशीर होतो. त्यामुळं यावर आळा घालण्यासाठी आता नवी मुंबई मनपानं हा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी हा निर्णय घेतला आहे.
(वाचा-लस घेतल्याच्या 11 दिवसांनंतर रेणुका शहाणे Covid पॉझिटिव्ह; मुलांनाही लागण)
राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारबरोबरच स्थानिक प्रशासन हे देखिल त्यांच्या पातळीवर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नवी मुंबई महापालिकेनंही मनपा हद्दीतील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळं आरोग्य यंत्रणाही त्यापद्धतीनं सज्ज ठेवावी लागणार आहे. कारण दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळं वाढेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Home quarantine