मुंबई, एप्रिल 18 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मोठ्या प्रमाणात बॉलिवूडला (Bollywood) बसला आहे. सेलिब्रेटींना Covid-19 ची लागण होतीये. अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) काही दिवस आधी कोरोना पॉझिटीव्ह झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka shahane) आणि दोन्ही मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हे तिघेही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.
आशुतोष राणा कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही कोरोना चाचणी केली. शनिवारी संध्याकाळी कोरोना टेस्टचा रिपोर्ट येताच रेणुका शहाणे आणि त्यांची मुलं आयसोलेट झाले आहेत. याआधी आशुतोष राणा यांनी स्वत:ला घरातच क्वॉरंटाईन केलं आहे. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी 6 एप्रिलला कोरोना लशीचा (Covide-19 Vaccination) पहिला डोस घेतला होता. त्यावेळा ट्विटर वरुन कोरोना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. आता कोरोना पॉझिटीव्ह झाल्यावर त्यांनी संपर्कात आलेल्या सगळ्यांना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन केलं आहे.
BKC कोविड लसीकरण केंद्राच्या उत्तम सेवेसाठी @mybmc @CMOMaharashtra @PMOIndia व कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार 🙏🏽 आज आम्ही लसिकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा 🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/TGHyAN7Kd7
— Renuka Shahane (@renukash) April 6, 2021
हे ही वाचा-शक्तिमानमधील खलनायकाला कोरोनाची लागण; डॉ. जयकॉल मागतोय प्लाझ्मा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा रुळावर येत असलेलं बॉलिवूड मध्ये शनिवारी बरेच सेलिब्रेटी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. अर्जुन रामपाल,नील नितीन मुकेश,सोनू सूद,मनीष मल्होत्रा आणि सुमित व्यास यांनी कोरोना झाला आहे. याआधी अक्षय कुमार, आमिर खान, गोविंदा,कतरिना कैफ,विकी कौशन,आनिया भट,रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी यांना कोरोना झाला होता. कोरोनाच्या भितीमुळे काही सेलिब्रेटींनी मुंबईला रामराम केलाय. अभिनेत्री दिपीका पदुकोण आपल्या आई-वडिलांच्या घरी रहायला गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Renuka Shahane