जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल? नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल? नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल? नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

Maharashtra Government: ठाकरे सरकारमध्ये मंत्र्यांच्या खात्यात अदलाबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रात असलेल्या ठाकरे सरकार (Thackeray Government)मध्ये येत्या काळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या फेरबदलात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस नेते दिल्ली दौऱ्यावर जात असून दिल्लीत या संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य विधानसभा अध्यक्षपद अद्यापही रिक्तच आहे. या पदावर कुणाची निवड करावी या संदर्भातही दिल्ली दौऱ्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल असंही बोललं जात आहे. कोणाला मिळणार डच्चू आणि कोणाला संधी? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यावर पक्षातील नेते नाराज असून त्यांचे खाते इतर कुणाला तरी दिले जाणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, याला कुणीही दुजोरा दिला नव्हता. याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचंही नाव चर्चेत आहे. प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर नाना पटोले यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर एका राज्यमंत्रिपदावरही अदलाबदल होण्याची चर्चा होत आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोण, कोणाकडे किती संख्याबळ? ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस बहुमताचा आकडा सिद्ध करताना महाविकास आघाडीकडे 172 आमदार होते. आता कोविड कालावधीत काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराचे निधन झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे पंढरपूरची असलेली जागा भाजपाने जिंकत राष्ट्रवादीचा आमदार एक कमी झाला आहे. तर भाजपची संख्या वाढली मात्र त्याच दरम्यान एका आमदाराचा पाठिंबा कमी झाला आहे. अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर होताना महाविकास आघाडीला सरकार स्थापन करताना जितकी संख्याबळ होतं तितकीच त्यांच्याकडे कायम राहीलं हे दाखवून आव्हान असणार आहे. वाचा : राष्ट्रवादीला झटका, आमदार बाबाजानी दुर्रानींकडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभा आमदारांचं सध्याची राजकीय गणित महाविकास आघाडीचे संख्याबळ शिवसेना - 56 राष्ट्रवादी - 53 काँग्रेस - 43 तिन्ही पक्षांचे मिळून - 152 महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष बहुजन विकास आघाडी - 3 समाजवादी पार्टी - 2 प्रहार जनशक्ती पार्टी - 2 माकप - 1 शेकाप - 1 स्वाभिमानी पक्ष - 1 क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1 अपक्ष - 13 भाजपाकडे असलेले संख्याबळ मागील वेळेस भाजप - 106 जनसुराज्य शक्ती - 1 राष्ट्रीय समाज पक्ष - 1 अपक्ष - 5 एकूण - 113 तटस्थ भूमिका मागील वेळेस घेतलेले पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1 एमआयएम - 2

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात