विरार, 01 सप्टेंबर: विरार येथील मीरा रोड परिसरात हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे. केवळ सेम रंगाचा टीशर्ट परिधान केल्यानं एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. अचानक आलेल्या नऊ जणांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत संबंधित तरुणाची जीव घेतला आहे. या भयंकर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी चौकशी केली असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शुभम भुवड असं हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मीरा रोड पूर्व परिसरातील सिल्व्हर पार्क परिसरात वास्तव्याला आहे. रविवारी तो मीरा रोड परिसरात लाल टीशर्ट परिधान करून आपल्या एका मित्राला भेटायला गेला होता. दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभं असताना, त्याठिकाणी तावातावात आलेल्या नऊ जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. या दुर्दैवी घटनेत शुभमचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा- न विचारता माहेरी गेल्यानं सासूची सटकली; सुनबाई सासरी परत येताच केलं अमानुष कृत्य नेमकं काय घटलं? खरंतर, रविवारी मीरा रोड येथील हटकेश परिसरात एका आरोपी तरुणाच्या दुचाकीला लाल रंगाचा टीशर्ट परिधान केलेल्या एका तरुणानं कट मारून पसार झाला होता. त्यामुळे संबंधित आरोपी आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं कट मारून जाणाऱ्या युवकाचा शोध घेत होता. दरम्यान त्यांना त्याच परिसरात सेम टीशर्ट परिधान केलेला शुभम उभा असलेला दिसला. यावेळी संतापाच्या भरात आलेल्या तरुणांनी कसलीही विचारपूस न करता शुभमला मारहाण करायला सुरुवात केली. हेही वाचा- पत्नीच्या निधनानंतर दु:खानं आतून पोखरलं; पुण्यात पोलीस ऑफिसरनं स्वत:ला संपवलं आमच्या गाडीला कट मारून जातो काय? असं म्हणत आरोपींनी लाथा बुक्क्यांनी शुभमला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत निष्पाप शुभमचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती शुभमच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आठ आरोपींना गजाआड केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







