जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / औरंगाबाद: न विचारता माहेरी गेल्यानं सासूची सटकली; सुनबाई सासरी परत येताच केलं अमानुष कृत्य

औरंगाबाद: न विचारता माहेरी गेल्यानं सासूची सटकली; सुनबाई सासरी परत येताच केलं अमानुष कृत्य

औरंगाबाद: न विचारता माहेरी गेल्यानं सासूची सटकली; सुनबाई सासरी परत येताच केलं अमानुष कृत्य

Crime in Aurangabad: कुटुंबातील एका किरकोळ कारणातून स्वाभीमान दुखवल्यानं सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (mother in law beat daughter in law) धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 31 ऑगस्ट: कुटुंबातील एका किरकोळ कारणातून स्वाभीमान दुखवल्यानं सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (mother in law beat daughter in law) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सिडको परिसरातील त्रिवेणीनगरात घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल ( FIR Lodged) करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. एका क्षुल्लक कारणांतून सासूबाईनं सुनबाईला दिलेल्या शिक्षेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सिडको परिसरातील  त्रिवेणीनगर याठिकाणी राहणारी फिर्यादी विवाहितेची 22 ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्या सासूबाईला न विचारता, आंबेडकरनगर येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या. सुनबाई न विचारता माहेरी गेल्यानं सासुबाईंचा स्वाभिमान दुखावला होता. त्यामुळे सुनबाईबद्दल त्यांच्या मनात राग होता. हेही वाचा- पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण समोर दरम्यान रविवारी फिर्यादी महिला परत आपल्या सासरी आली. यावेळी सासूनं ‘मला न विचारता तू माहेरी का गेलीस?’ या कारणावरून वाद घालायला सुरुवात केली. यानंतर वाद वाढत जात, सासूबाईनं आपल्या सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये सुनबाईचं डोकं फुटलं आहे. या घटनेनंतर जखमी सुनबाईनं सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात