मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /खळबळजनक! प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

खळबळजनक! प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

 प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे (Shanaya Katwe) हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे (Shanaya Katwe) हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे (Shanaya Katwe) हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

हुबळी, 27 एप्रिल: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे (Shanaya Katwe) हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. 32 वर्षीय राकेश काटवेच्या (Rakesh Katwe Murder) खून प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मीडिया अहवालानुसार राकेशचं डोकं धडावेगळं करण्यात आलं होतं, देवरगुडीहल वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत त्याचं डोकं आढळलं तर शरीराचा इतर भाग हुबळीतील गाडग रोड आणि इतर परिसरात आढळून आला आहे. मृतदेहाचे तुकडे करून ते शहरातील विविध ठिकाणी फेकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धारवाड जिल्हा पोलिसांनी (Dharwad District Police) शहरातील आणखी चार संशयितांना अटक केली आहे. नियाझअहमद कटिगार (वय 21), तौसिफ चन्नापूर (वय 21), अल्ताफ मुल्ला (वय 24) आणि अमन गिरणीवाले (वय 19) अशी अटक केली आहे. New Indian Express ने याबाबत वृत्त दिले आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, राकेशची बहीण आणि अभिनेत्री शनायाचे या प्रकरणातील संशयित नियाझअहमदशी प्रेमसंबंध होते. राकेशने त्यांच्या प्रेमसंबंधांला विरोध दर्शवल्यामुळे त्याने हा कट रचल्याचा आरोप केला जात आहे.

शनाया काटवे, अभिनेत्री

शनाया काटवे, अभिनेत्री

9 एप्रिल रोजी अभिनेत्री जेव्हा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात गेली होती तेव्हा ही भयंकर घटना शनाया आणि राकेश यांच्या हुबळी येथील घरामध्ये  घडली. राकेशची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कटिगार आणि त्याच्या साथीदारांनी त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ते शहरातील आणि आसपासच्या ठिकाणी फेकून दिले, अशी माहिती आहे.

मॉडेल-अभिनेत्री-शनायाने 2018 मध्ये कन्नड चित्रपट ‘इडम प्रेमम जीवनम’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आणि अलीकडेच आलेला अडल्ड कॉमेडी सिनेमा ‘ओंदू घनतेया काथे’मध्ये ती दिसली.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Murder