मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कडक लॉकडाऊनमध्ये शेगावात लॉजवर सुरू होती देहविक्री, कोलकात्याच्या तरुणीला अटक

कडक लॉकडाऊनमध्ये शेगावात लॉजवर सुरू होती देहविक्री, कोलकात्याच्या तरुणीला अटक


 नागपूर येथील एका एजंटकडून या युवतीला शेगाव येथे पाठवण्यात आले असल्याचं सांगण्यात येते आहे.

नागपूर येथील एका एजंटकडून या युवतीला शेगाव येथे पाठवण्यात आले असल्याचं सांगण्यात येते आहे.

नागपूर येथील एका एजंटकडून या युवतीला शेगाव येथे पाठवण्यात आले असल्याचं सांगण्यात येते आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 27 एप्रिल : कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात कडक निर्बंध (Maharashtra Lockdown) लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. पण, असं असतानाही बुलडाण्यात (Buldhana) लपूनछपून अवैध धंदे सुरूच आहे. शेगाव (shegaon) इथं एका लॉजवर पोलिसांनी कारवाई करून एका मुलीला अटक केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आनंद सागरजवळील (anand sagar shegaon) अंबर लॉजवर देहविक्रीसाठी (Prostitution) आलेल्या कोलकात्याच्या एका युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री झालेल्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. या युवतीसोबत या लॉजवरून एक ग्राहक व लॉज मॅनेजरला सुद्धा अटक करण्यात आली आहे.

पत्नीला नांदायला न पाठवल्यानं जावयानं उगवला सूड, धारधार कोयत्याने सासूची हत्या

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या आदेशाने शेगाव पोलिसांनी ही कारवाई केली असल्यानं सांगण्यात येत आहे.

नागपूर येथील एका एजंटकडून या युवतीला शेगाव येथे पाठवण्यात आले असल्याचं सांगण्यात येते आहे. गेल्या 5 दिवसांपासून ही तरुणी याच लॉजवर राहत होती.

VIDEO: रुग्णालयाबाहेर वेदनेनं तडफडत होती गर्भवती, डॉक्टरनं स्वतः उचलून घेतलं

लॉज बंद असताना हा गोरखधंदा सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना खबऱ्याच्या मार्फत मिळाली होती. त्यानंतर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी कारवाईचे आदेश दिले. सोमवारी रात्री पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला असता तरुणी आणि एक ग्राहक आढळून आले. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:
top videos