बहिणीच्या बलात्काराचा भावानं घेतला बदला, जेलमध्येच 6 वर्ष फिल्मी स्टाइल केलं प्लॅनिंग आणि...

बहिणीच्या बलात्काराचा भावानं घेतला बदला, जेलमध्येच 6 वर्ष फिल्मी स्टाइल केलं प्लॅनिंग आणि...

बदला घेण्यासाठी रचलेला कट हा एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जुलै : दिल्लीच्या तिहार कारागृहातील एका कैद्यानं आपल्या बहिणीवरील बलात्काराचा बदला घेण्यासाठी धारदार शस्त्राने दुसर्‍या कैद्याची हत्या केली. यासाठी हा कैदी तब्बल 6 वर्ष प्लॅनिंग करत होता. त्यानं रचलेला कट हा एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही आहे.

2014मध्ये दिल्लीच्या आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या झाकीर नावाच्या आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर मेहताब नावाच्या व्यक्तीनं बलात्कार केला होता. त्यानंतर पीडितेने आत्महत्या केली. या घटनेने झाकीर हादरून गेला होता. त्या दिवसापासून झाकीरनं आपल्या बहिणीच्या बलात्काराचा सूड घेण्याचा निश्चय केला होता. याचदरम्यान बलात्कार प्रकरणी मेहताबला शिक्षा ठोठावण्यात आली. मेहताबची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.

वाचा-'सुशांतवरील #MeToo चा आरोप केवळ अफवा', या अभिनेत्रीचे पोलिसांकडे स्पष्टीकरण

सहा वर्ष कट रचल्यानंतर झाकीरला अखेर बदला घेण्याची संधी मिळाली. झाकीर मेहताबला मारण्यासाठी अनेक वर्ष कट रचत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी 21 वर्षीय झाकीरनं तिहार कारागृह क्रमांक 8/9 मध्ये निजामुद्दीन येथे राहणाऱ्या मोहम्मद मेहताबवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की झाकीरनं पहाटे सहाच्या सुमारास मेहताबच्या पोटावर आणि घश्यावर अनेक हल्ले केले.

वाचा-अरे देवा! मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा, नेमका काय घडला प्रकार वाचा

असं केलं प्लॅनिंग

झाकीर 2018 मध्ये खुनाच्या आरोपाखाली तिहार तुरूंगात गेला होता परंतु मेहताब तिहारच्या दुसऱ्या तुरूंगात होता. त्याचवेळी झाकीरने मेहताबला मारण्यासाठी कट रचण्यास सुरुवात केली होती. विनाकारण झाकीरनं आपल्या सहकाऱ्यांशी भांडण सुरू केलं. दररोज होणारे वाद पाहून तिहार प्रशासनाने झाकीरला जेल नंबर 8 च्या त्याच वॉर्डमध्ये हलवले, जिथं मेहताब कैदी म्हणून होता. याचाच फायदा घेऊन झाकीरनं धारदार शस्त्रानं मेहताबवर हल्ला केला. या हल्ल्यात मेहताब जागीच मृत्यू झाला.

वाचा-एकाच खड्ड्यात पुरले तब्बल 8 कोरोनाबाधितांचे मृतदेह, धक्कादायक VIDEO VIRAL

संकलन-प्रियांका गावडे.

First published: July 1, 2020, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading