मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाची (Mumbai Sakinaka rape case) घटना ताजी असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयातच एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न (Woman allegedly sexual harassed in Mumbai BJP Corporator office) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेविकेच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली (Borivali) परिसरातील एका भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर भाजप कार्यकर्त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर तक्रार दाखल करुनही पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अखेर आता बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
Maharashtra: A female BJP worker was sexually harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15. Based on the woman's complaint, an FIR was registered at Borivali Police Station yesterday
— ANI (@ANI) September 23, 2021
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला एक समाजसेविका आहे. ही महिला भाजपच्या कार्यालयात काही कामासाठी गेली होती त्यावेळी आरोपीसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पीडित महिला भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात गेली असता आरोपीने कार्यालय बंद करुन पीडित महिलेचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
दिल्लीतील निर्भया प्रकारासारखीच मुंबईत घटना
मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर एक टेम्पोत महिलेवर बलात्कार झालेल्या बलात्कारानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या शेजारील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करुन सर्वप्रथम घटनेची माहिती दिली. रात्री 3.20 मिनिटांनी कंट्रोल रूमला फोन आला आणि 10 मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या कपड्यांवर रस्ताचे डाग आढळून आले आहेत. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे.मोहन चौहान हा उत्तरप्रदेशच्या जौनपूरचा रहिवासी आहे.
'मानसिक आजार दूर करण्यासाठी शरीरसंबंध ठेवावे लागतील', YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार
मानसिक आजार दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या वसईतील यूट्यूब डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आजार दूर करण्यासाठी मुलीला शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. तसेच मद्यपान करावं लागेल, असे अजब सल्ले दिल्याने संबंधित यूट्यूब डॉक्टरचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.