जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Rape Case: आरोपीवर बलात्कारासोबतच हत्येचाही गुन्हा दाखल, अशा आवळल्या पोलिसांनी मुसक्या

Mumbai Rape Case: आरोपीवर बलात्कारासोबतच हत्येचाही गुन्हा दाखल, अशा आवळल्या पोलिसांनी मुसक्या

Mumbai Rape Case: आरोपीवर बलात्कारासोबतच हत्येचाही गुन्हा दाखल, अशा आवळल्या पोलिसांनी मुसक्या

Mumbai Rape Case accused is from up: मुंबई पोलिसांनी साकीनाका बलात्कार प्रकऱणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर एक टेम्पोत महिलेवर बलात्कार (Sakinaka Mumbai Rape Case) झालेल्या बलात्कारानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू (Victim died) झाला आहे. आरोपी मोहन चौहान (accused Mohan Chauhan) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या शेजारील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करुन सर्वप्रथम घटनेची माहिती दिली. रात्री 3.20 मिनिटांनी कंट्रोल रूमला फोन आला आणि 10 मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या कपड्यांवर रस्ताचे डाग आढळून आले आहेत. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाली आहे. मोहन चौहान हा उत्तरप्रदेशच्या जौनपूरचा रहिवासी आहे. या संपूर्ण प्रकऱणाचा तपास पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम यांच्याकडे देण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात येईल. पीडित महिलेच्या मृत्यूनंतर आरोपीच्या विरोधात बलात्कारासोबतच हत्येचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालणार आहे. पीडित महिला बेशुद्धावस्थेत असल्याने तिचा जबाब आम्हाला घेता आला नाही. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य, गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल - मुख्यमंत्री साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , mumbai , Rape
  • First Published :
जाहिरात
जाहिरात