मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री, एसी आणि कुलर होणार महाग

कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री, एसी आणि कुलर होणार महाग

भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे.

भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे.

भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 28 फेब्रुवारी : थंडी संपून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता घरामध्ये एसी, कुलर घेण्याची लगबग सुरू होईल. मात्र यंदा तुम्ही जर नव्यानं एसी, कुलर, फ्रीज इत्यादी वस्तू घेण्याचा निर्णय घेत असाल तर तुमचा खिशाला मात्र चांगलाच जाळ लागू शकतो. त्याचं कारण म्हणजे मार्च महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची किंमत वाढवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे जगभरात फोफवणारा कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 2 हजारहून अधिक लोकांचे बळी गेले असून 48 देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त चीन, जपानमध्ये याचं प्रमाण असल्यानं आणि बहुतांश इलेक्ट्रीकल वस्तू किंवा त्याचे भाग हे या देशांमधून आयात केले जातात मात्र त्याचाच मोठा प्रमाणात तुटवडा असल्यानं या किमती वाढण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला ह्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नवीन एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जास्त महाग होणार आहेत. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एलजी, वोल्टास, सॅमसंग, पॅनासोनिक, हायर कंपनी वस्तूंची किंमत वाढवणार असल्याचं सांगितलं आहे. या कंपनीच्या वस्तुंची किंमत जवळपास 3 ते 4 हजार रुपयांनी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर बजाज कंपनीच्या काही वस्तूंवर ड्युटी चार्जेस वाढवण्यात आले आहेत.

हेही वाचा-शेअर बाजाराला कोरोनाचा फटका, काही मिनिटांत 4 लाख कोटींचे नुकसान

आतापर्यंत जगातील तब्बल 48 देशांतील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 2,802 जण मरण पावले आहेत. तर 82,059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

WHO कडून नियंत्रणाचे संकेत

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असंही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग झाल्या आहेत. चीनमधल्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भीषण झाली होती. चीन आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये सॅमसंग, LG या कंपन्यांचं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन होतं. नेमक्या याच देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे.

हेही वाचा-OMG! महिलेच्या टेस्टनंतर डॉक्टरांनाही बसला जबर धक्का, युरिन ऐवजी निघाली दारू

First published: