मुंबई, 22 जुलै : राज्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था रुग्णांच्या मदतीसाठी कामाला लागली आहे. हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी घडाळाच्या काट्यावर फिराणारी ही मुंबई एका क्षणात ठप्प झाली. पण मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे. मुंबईकरांना लवकरच पाणीकपतीला सामोरं जावं लागू शकतं. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा खूप कमी आहे. मागच्या दोन वर्षात यावेळेला सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतं. या महिन्याच्या शेवटापर्यंत वाट पाहून प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाण्याचा योग्य वापर करा आणि पाणी वाया घालवू नका. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती खरंतर, मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची गरज आहे. गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नालाही तोंड द्यावं लागणार आहे. कोणत्या तलावात किती पाणीसाठा आहे आणि मागच्या वर्षी तो किती होता? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा ( दशलक्ष लिटर मध्ये तलाव- अप्पर वैतरणा यावर्षी पाणीसाठा- 20 हजार 586 मागच्या वर्षी- 31हजार 435 तलाव- मोडक सागर यावर्षी पाणीसाठा- 48 हजार 568 मागच्या वर्षी- 1 लाख 4 हजार लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे साईमंदिर उघडणार का? शिर्डीच्या भयावह परिस्थितीचा आढावा तलाव- तानसा यावर्षी पाणीसाठा- 34 हजार 640 मागच्या वर्षी- 1 लाख 22 हजार 404 तलाव- मध्य वैतरणा यावर्षी पाणीसाठा- 54 हजार 220 मागच्या वर्षी- 1 लाख 40 हजार 101 तलाव- भातसा यावर्षी पाणीसाठा- 2 लाख 33 हजार 680 मागच्या वर्षी- 3 लाख 55 हजार 964
तलाव- विहार यावर्षी पाणीसाठा- 16 हजार 687 मागच्या वर्षी- 16 हजार 207 तलाव- तुळशी यावर्षी पाणीसाठा- 7 हजार 949 मागच्या वर्षी- 8 हजार 11