लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे साईमंदिर उघडणार का? शिर्डीच्या भयावह परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे साईमंदिर उघडणार का? शिर्डीच्या भयावह परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट

लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून साई मंदिर बंद आहे. त्यामुळे शिर्डीतील नागरिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

  • Share this:

शिर्डी, 22 जुलै : राज्यात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशच लॉकडाऊन आहे. अशात राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शिर्डीचंच बोलायचं झालं. तर संपूर्ण शिर्डी ही साई मंदिरामुळे सुरू आहे. शिर्डीत राहणाऱ्या लोकांचा संपूर्ण व्यवसायच साई मंदिरावर अवलंबून आहे. पण लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून साई मंदिर बंद आहे. त्यामुळे शिर्डीतील नागरिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

खरंतर, लॉकडाऊन झाल्याच्या अडीच महिन्यापर्यंत साईबाबांची शिर्डी कोरोनामुक्त होती. पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाचे रूग्ण वाढण्यास सुरुवात झाली. शिर्डीतील हजारो व्यावसायिकांची यामुळे चिंता वाढली आहे. दिवसागणिक रूग्ण वाढत असल्यानं लवकरच साईमंदिर सुरू होईल ही आशा आता धुसर झाली आहे. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय साईमंदिरावर अवलंबून आहे त्यांच्यासमोर आर्थिक संकटाचा डोंगर उभा राहिला आहे.

शिर्डी हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. शिर्डीत रोज लाखो भक्तांची गर्दी असते. त्यामुळे इथला व्यवसायिकदेखील साई मंदिरावरच अवलंबून आहे. शिर्डीतले फूलं आणि प्रसाद विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट, इतर सजावटीच्या वस्तू, शॉपिंगची भली मोठी दुकानं, वाहतूक पार्किंग, फूल आणि दुध उत्पादक शेतकरी, इत्यादींचा उदरनिर्वाह हा साई मंदिरावर निर्भर आहे.

लॉकडाऊन संपताना वाढतेय नोकरीची संधी, 'या' क्षेत्रात मिळणार बम्पर जॉब्स

शिर्डीच्या साई मंदिरात तब्बल 7 हजार कर्मचारी काम करतात. साई मंदिरामुळे लाखो भाविक रोज शिर्डीत येत असतात. त्यामुळे 600 ते 700 हॉटेल्स शिर्डीत आहेत. रोज हजारो वाहनं शिर्डीत असतात. त्यामुळे मंदिर सुरू झालं तर कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी शिथिल झालं असलं तरी साई मंदिर सुरू होईल याची शक्यता कमी आहे.

शरद पवारांनी तेढ निर्माण करू नये, 'सिल्व्हर ओक'वर 50000 पोस्टकार्ड पाठवणार

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. अशात मंदिर सुरू झालं तर धोका आणखी वाढू शकतो. पण या सगळ्यामुळे लोकांची आर्थिक अवस्था मात्र बिकट होत चालली आहे हेदेखील खरं. गेल्या काही दिवसांमध्ये शिर्डीमध्ये पैशांवरून दोन हत्या झाल्याचंही समोर आलं. एका व्यवसायिकाने आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्याची घटनाही समोर आली. त्यामुळे कोरोनामुळे तर लोक जीव गमावत आहेत पण आर्थिक अडचणही अनेकांचा बळी घेतेय.

संपादन आणि संकलन - रेणुका धायबर

Published by: Renuka Dhaybar
First published: July 22, 2020, 5:05 PM IST

ताज्या बातम्या