मुंबई, 28 मे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यभरात जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे 30 मेनंतरही लॉकडाऊन पूर्णपणे उठविण्यात येणार नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. दरम्यान जिल्हा बंदी बाबत मोठी बातमी समोर आली आहे. काल कॅबिनेटच्या बैठकीत अनलॉकबाबत चर्चा झाली.
10 जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मेनंतर नियमात फार बदल होणार नाहीत. मात्र 10 जूननंतर मात्र जिल्हा बंदी उठवली जाऊ शकते. 10 जूननंतर टप्प्या-टप्प्याने नियम शिथिल करण्यात येतील. दुसरीकडे 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालयं 50 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
उद्या यासंदर्भात राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना येऊ शकतात.
हे ही वाचा-Fact Check : घरातील फ्रिज आणि कांद्यातूनही होऊ शकतं ब्लॅक फंगसचं इन्फेक्शन?
अद्यापही 21 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे 30 मेनंतर अनलॉक होणार नाही. दुसरीकडे दुकानांची वेळ वाढविण्याची मागणीही केली जात आहे. सध्या 7 ते 11 वेळापर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र यात वाढ करुन 11 ते 2 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक रुग्णालयातील बिल तपासण्यात येणार आहेत. रुग्णालयांत ऑडिटर नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात लसीकरण दर वेगवेगळे ते नियमित करण्याचा विचार सुरू आहे. यासोबतच महात्मा फुले आरोग्य योजनेचा विमा दीड लाखाचा असला तरी त्यावर जरी खर्च लागला तर तो खर्च सरकार देणार असा अध्यादेश काढण्यात आला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Lockdown, Mumbai