मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Unlock Guidelines: मुंबई अनलॉक संदर्भात नियमावली जाहीर; पाहा काय सुरू आणि काय बंद

Mumbai Unlock Guidelines: मुंबई अनलॉक संदर्भात नियमावली जाहीर; पाहा काय सुरू आणि काय बंद

Mumbai Unlock Guidelines: मुंबई अनलॉकच्या संदर्भात बीएमसीने जाहीर केली नियमावली. जाणून घ्या सविस्तर.

Mumbai Unlock Guidelines: मुंबई अनलॉकच्या संदर्भात बीएमसीने जाहीर केली नियमावली. जाणून घ्या सविस्तर.

Mumbai Unlock Guidelines: मुंबई अनलॉकच्या संदर्भात बीएमसीने जाहीर केली नियमावली. जाणून घ्या सविस्तर.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 5 जून: महाराष्ट्रातील लॉकडाऊन पाच टप्प्यांत अनलॉक (Maharashtra unlock in 5 levels) होणार आहे. यानुसार टप्प्याटप्प्यानुसार अनलॉक प्रक्रिया 7 जून पासून सुरू होणार आहे. याच संदर्भात मुंबई महानगरपालिकेने आपली नियमावली (BMC issues guidelines for unlock) जाहीर केली आहे. शासनाच्या नियमानुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात (Mumbai comes in 3rd level) येते त्यामुळे लेवल 3 चे सर्व नियम मुंबईत लागू असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे हे आदेश 7 जून 2021 पासून लागू होणार आहेत. नवे आदेश जाहीर करताना मुंबई महानगरपालिकेने हे स्पष्ट केले आहे की, मनपाकडून 'ब्रेक द चेन' मिशन अंतर्गत यापूर्वी जारी केलेले सर्व आदेश रद्द ठरतील.

लोकलबाबत काय निर्णय?

राज्य शासनाने निश्चित केलेल्या टप्प्यांनुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात येते. त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन तुर्तास सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. मुंबई लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार, मुंबईत सलून, जीम, स्पा सुरू करता येणार आहेत. मात्र, एकूण क्षमतेच्या 50 टक्के इतक्याच क्षमतेने सुरू करण्यास परवानगी आहे. तसेच जीम, सलून, स्पामध्ये एसीचा वापर करता येणार नाहीये.

अनलॉकबाबत राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, 5 स्तरात होणार अंमलबजावणी

काय सुरू काय बंद?

मुंबईतील रेस्टॉरंट, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू कऱण्यास मुंबई मनपाने परवानगी दिली आहे.

सलून, जीम, स्पामध्ये एसी सुरू करता येणार नाही.

लोकल ट्रेन तुर्तास बंदच राहणार आहे

सर्व दुकाने संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील

शनिवार रविवार बंद राहतील

मॉल, थेटर, सिनेमागृह बंद राहणार

सकाळी 5 ते 9 नागरिकांना मॉर्निग वॉकची मुभा

खाजगी कार्यालय आठवड्या दरम्यान संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील.

खेळासाठी पहाटे 5 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 परवानगी

चित्रीकरणाला 5 वाजेपर्यंत परवानगी

सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू असणार

बसेसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार मात्र, उभे राहून प्रवास करता येणार नाही

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, मुंबईतील सर्व दुकाने सकाळपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी दुकाने बंद राहतील. मुंबईतील मॉल, थेटर, सिनेमागृह बंदच राहणार आहेत.

एकूण पाच टप्प्यांत महाराष्ट्र अनलॉक

पहिला टप्पा - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्यांपेक्षा कमी भरलेले असतील.

दुसरा टप्पा - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेड्सची टक्केवारी 25 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान असेल.

तिसरा टप्पा - पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.

चौथा टप्पा - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स रुग्णांनी भरलेले असेल.

टप्पा पाचवा - जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स रुग्णांनी व्यापले असेल.

First published:

Tags: BMC, Mumbai