जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, मुंबई विद्यापीठाची मोठी घोषणा

अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, मुंबई विद्यापीठाची मोठी घोषणा

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

मुंबई विद्यापीठाने 14 आणि 15 जुलैला होणाऱ्या सर्व विभागांच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांसाठी नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै : हवामान विभागाने जारी केल्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 14 आणि 15 जुलैला होणाऱ्या सर्व विभागांच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या दोन दिवसात तितक्या तीव्रतेचा पाऊस पडला नाही. याशिवाय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात राज्यातील पाऊस उसंत घेणार आहे. त्याची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने रद्द केलेल्या परीक्षा 18 आणि 19 जुलैला घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने 14 जुलैच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. या परीक्षा 18 आणि 19 जुलैला होणार आहेत. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि एमएस्सी फायनान्स या परीक्षेच्या 9 विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची केंद्रे यापूर्वी जी होती तीच राहणार आहेत. ( जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा.. शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावरुन अजित पवार भडकले ) कम्युनिकेशन स्किल्स, प्रोफेशनल कम्युनिकेशन एथिक्स -I, फायनान्शियल अकाऊंटिंग अँड मॅनेजमेंट, इंटरप्रेन्युअरशीप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स अँड सीएसआर, फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज या विषयांच्या परीक्षा सोमवार18 जुलैला होणार आहेत. तर क्लिनिकल इम्युनोलॉजी अँड इम्युनोपॅथॉलॉजी या विषयाची परीक्षा मंगळवारी 19 जुलैली होणार आहे. या परीक्षेच्या तारखेसंदर्भात समाजमाध्यमात काही चुकीचे संदेश पसरत आहेत, त्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे आणि विषयांच्या तारखेबाबत विद्यापीठाचे संकेतस्थळ व आपल्या संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात