मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Terror Alert : खलिस्तानी संघटनांचा मुंबईत घातपात घडवण्याचा मोठा कट, मंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, कडेकोट बंदोबस्त

Mumbai Terror Alert : खलिस्तानी संघटनांचा मुंबईत घातपात घडवण्याचा मोठा कट, मंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, कडेकोट बंदोबस्त

मुंबईत (Mumbai) गर्दीच्या ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत.

मुंबईत (Mumbai) गर्दीच्या ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत.

मुंबईत (Mumbai) गर्दीच्या ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत.

मुंबई, 30 डिसेंबर : मुंबई (Mumbai) आणि देशावर सध्या संकटांची मालिकाच जणू काही सुरु आहे. कोरोनाच्या दोन लाटांनी (Corona wave) प्रचंड छळ केल्यानंतर आता ओमायक्रोन (omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या रुपाने नवं संकट उभं राहिलं आहे. या नव्या संकटाच्या आव्हानाला सामोरं कसं जायचं या विचारात सर्वसामान्य असतानाच आता चिंता वाढवणारी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला खलिस्तानी संघटना मुंबईत घातपाताचा मोठा कट आखत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या (Intelligence Agency) हाती लागली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) 31 डिसेंबरला असणाऱ्या साप्ताहिक आणि इतर सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात आहे. काही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. सुरक्षा खात्याच्या प्रत्येक विभागाला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक पोलीस ठाणे, पोलीस चौकी पासून ते क्राईम ब्रांच या सगळ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : नायजेरियाहून आलेल्या रुग्णाचं पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन, मृत्यूनंतर Omicron Report पॉझिटिव्ह

एका संशयिताला विदेशात बेड्या

केंद्रीय तपास यंत्रणेला काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की, खलिस्तानी दहशतवादी मुंबईत एखादी घातपाताची घटना घडवून आणू शकतात. याच माहितीच्या आधारावर तपास केला असताना सुरक्षा यंत्रणांना काही संशयितांची माहिती मिळाली होती. त्यामुळे मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलं होतं. पोलीस आपापल्या स्तरावर संशयतियांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यापैकी एक संशयित विदेशात पकडा गेल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली.

गृहमंत्र्यांचा इशारा

यादरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 'एबीपी न्यूज'ला याबाबत प्रतिक्रिया दिलीय. मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी ठेवण्यात आली आहे. पण तरीही कुणी पार्ट्याचं आयोजन केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

First published: