Home /News /pune /

नायजेरियाहून आलेल्या रुग्णाचं पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन, मृत्यूनंतर Omicron Report पॉझिटिव्ह

नायजेरियाहून आलेल्या रुग्णाचं पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन, मृत्यूनंतर Omicron Report पॉझिटिव्ह

राज्यात आज तब्बल 198 नवे ओमायक्रोनबाधित रुग्णांची नोंद झालीय. यापैकी एका रुग्णाच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. ज्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय खरंतर त्याचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालंय.

पुणे, 30 डिसेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूच्या संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दरदिवशी 20 ते 30 च्या संख्येने आढळणाऱ्या ओमायक्रोनबाधित रुग्णांच्या संख्येत तर आज प्रचंड मोठी वाढ बघायला मिळाली आहे. राज्यात आज तब्बल 198 नवे ओमायक्रोनबाधित रुग्णांची नोंद झालीय. यापैकी एका रुग्णाच्या मृत्यूची (death) देखील नोंद झाली आहे. ज्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय खरंतर त्याचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालंय. त्याचा NIA रिपोर्ट आज समोर आला आहे. त्यामध्ये त्याला ओमायक्रोनची लागण झााली होती, अशी माहिती समोर आली आहे. पण रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आज तीन रुग्णांना एनआयव्ही रिपोर्ट समोर आले आहेत. यामध्ये तीन जणांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यापैकी एकजण हा नायजेरिया येथून आला होता. तर उर्वरित दोन रुग्ण हे त्याचे निकटवर्तीयच असल्याचं समोर आलं आहे. नायजेरिया येथून आलेल्या रुग्णाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील रुबी एलकेअर कार्डीयाक सेंटर येथे 28 डिसेंबरला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या रुग्णाचा ओमायक्रोन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आज समोर आला आहे. या रुग्णाची ओमायक्रोनची लागण प्रासंगिक निदान असल्याचं महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. हेही वाचा : दुखापतग्रस्त असतानाही Bumrah ने केलं सगळ्यात जलद शतक, विक्रमालाही गवसणी राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 198 रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, यामध्ये फक्त 30 जण परदेशातून आलेले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई-पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू?
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळले आहेत, पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई-पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलंय. या ३८ जणांचा कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय, अशी माहिती राज्य साथरोग सर्वेक्षण कक्षाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. हेही वाचा : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी! मुंबईमध्ये आज 190 रुग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळले आहेत. सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरीमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. तर कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी 3 रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण डोंबिवलीतील या तीनही रुग्णांचा कोणत्याही परदेशी प्रवाशीची नोंद नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सर्व रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या