मुंबई, 25 नोव्हेंबर: एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. मुंबईमध्ये 2013 साली शक्ती मिल गॅगरेप बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी अंतिम निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे. या तिन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
आज शक्ती मिल बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 5 पैकी 3 आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे.
हेही वाचा- Terror Alert! आयएसआयच्या ट्रार्गेटवर RSSचे नेते?, भारतात पाठवले 11 टिफिन बॉम्ब
4 डिसेंबर 2014 रोजी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. हे आव्हान 3 जून 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलं होतं.
आरोपींची शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवर नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर या खंडपीठानं निकाल राखून ठेवला होता. आज या खंडपीठानं राखून ठेवलेला अंतिम निकार जाहीर केला.
हेही वाचा- स्वबळाचा नारा देणाऱ्या Congressला झटका, NCP नं उचचलं मोठं पाऊल
या खटल्यासाठी राज्य सरकारनं वकील दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निकालाचं वाचन न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.
या गँगरेप प्रकरणात होते पाच
या प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. त्यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी होता त्याला बालसुधार गृहात पाठण्यात आलं होतं.
हेही वाचा- याला म्हणतात प्रामाणिकपणा, पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी केला 90 किमी प्रवास
तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या तिघांनाही आज हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.