लखनऊ, 30 मे : उत्तर प्रदेशातील महोबा (Mahoba) जिल्हा रुग्णालयात एक वृद्ध महिला आपल्या आजारी मुलावर उपचार करण्यासाठी आली होती. येथे डॉक्टरांनी रक्त देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, विधवा महिलेने आपले दागिने विकून पैशांची व्यवस्था केली आणि रक्ताची सोय करण्यासाठी रुग्णालयातील महिला कर्मचारीला 5 हजार रुपयांची लाच दिली. यानंतर रक्त देण्याच्या नावाखाली ग्लूकोजमध्ये लाल रंगाचं इंजेक्शन देऊन रक्त असल्याचं सांगून मुलाला दिलं. यानंतर मुलाची प्रकृती बिघडली. यानंतर प्रकरण समोर आलं. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आजारी तरुणाला दुसरीकडे रेफर केलं आहे. याशिवाय सीएमएचने तपासाचे आदेश दिले आहेत. ही घटना महोूा सदर तहसीलच्या भंडारा गावातील आहे. येथे राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्ध विधवा राजकुमारी आपला मुलगा जुगलसह भाड्याच्या घरात राहते. सरकारी मदतीच्या नावाखाली तिला आतापर्यंत सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मुलाला रक्ताची गरज असल्याचं सांगितलं. त्यावेळी महिलेजवळ पैसे नव्हते. मात्र मुलावरील उपचारासाठी तिने स्वत:कडील दागिने विकले आणि रुग्णालयात रक्ताची सोय व्हावी यासाठी रुग्णालयातील महिला कर्मचारीला 5 हजार रुपयांची लाच दिली. मात्र कर्मचारीने रक्ताच्या नावाखाली ग्लुकोजमध्ये लाल रंगाचं इंजेक्शन देऊन हे पाणी मुलाला चढवलं. यानंतर मुलाची प्रकृती अधिक बिघडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.