जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Corona : दिवसभरात जवळपास 21 हजार रुग्ण, साडेआठ हजार रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona : दिवसभरात जवळपास 21 हजार रुग्ण, साडेआठ हजार रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona : दिवसभरात जवळपास 21 हजार रुग्ण, साडेआठ हजार रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत काल कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांचा पार गेला होता. त्यानंतर आज हाच आकडा जवळपास 21 हजारांच्या आसपास आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जानेवारी : मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा (Mumbai Corona Cases) प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी ही दररोज नवनवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. मुंबईत काल कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांचा पार गेला होता. त्यानंतर आज हाच आकडा जवळपास 21 हजारांच्या आसपास आला आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 20 हजार 971 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 हजार 616 जणांना लक्षणे नाहीत. तर 1 हजार 395 रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तसेच मुंबईत दिवसभरात 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासूनची मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी बघितली तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात घसरली आहे. मुंबईत बुधवारी लक्षणे न आढळलेल्या बाधितांची संख्या 87 टक्के होती. हीच आकडेवारी काल दोन टक्क्यांनी घसरली होती. म्हणजे काल 85 चक्के लक्षणे नसलेलेल रुग्ण आढळले होते. पण आज हाच आकडा आणखी एक टक्क्याने घसरला आहे. मुंबईत आज 84 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आढळले आहेत. राज्यातील विविध जिल्हा-शहरांमध्ये दिवसभरात किती रुग्ण आढळले? परभणी जिल्ह्यात दिवसभरात 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सध्या 121 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भिवंडी शहरात आज दिवसभरात 101 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरातील सध्या 281 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हेही वाचा :  मुंबईत Lockdown?, महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली महत्त्वाची माहिती पुण्यात पिंपरी चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात तब्बल 1 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना विस्फोट होताना दिसत आहे. केडीएमसी हद्दीत आज दिवसभरात 1 हजार 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. तर दिवसभरात 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती कधी निस्तारेल? दरम्यान, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी ही परिस्थिती सुधारावी यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयी माहिती दिली. “नागरिकांनी जबाबदारीने वागले, गर्दी कमी केली, मास्क वापरलं तर आपण कोरोनाची ही लाट नियंत्रणात आणू शकतो. पण तसं घडताना दिसत नाहीय. बरेचजण अजूनही मास्क वापरताना दिसत नाहीय. ओमायक्रोन मास्क घेतलेल्यांनाही होतोय. त्यामुळे काळजी घेतली तर त्याची तीव्रता करता येईल”, असं राहुल पंडित यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात