फक्त 60 सेकंदांमध्ये 10 घरांवर कोसळलं वडाचं झाड, पाहा थरारक Live Video

फक्त 60 सेकंदांमध्ये 10 घरांवर कोसळलं वडाचं झाड, पाहा थरारक Live Video

निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईत तुफान पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हे वडाचं झाडं कोसळलं.

  • Share this:

नवी मुंबई 3 जून: नवी मुंबईतल्या बैठ्या चाळीतील 10 घरांवर बुधवारी अजस्त्र वडाचं झाड कोसळलं. यावेळी या घरांमध्ये सुमारे 25 लोक होते ते तब्बल दोन तास अडकले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. नेरुळ सेक्टर 2 वारणा कॉलनी मधील बैठ्या चाळीतील घरांवर आज हे संकट ओढवलं होतं. महापालिकेला कळवून देखील कोणतीही मदत न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. नागरिक अडकले असताना महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईत तुफान पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हे वडाचं झाडं कोसळलं. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे त्याचं ओझं पेलवलं नाही त्यामुळे हे झाडं कोसळून पडलं. सुदैवाने मोठी हानी टळली.

निसर्ग चक्रीवादळाने राज्यात दोन जणांचा बळी घेतला. निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबाग मध्ये गेलाय. अलिबाग मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. जोराच्या वाऱ्यांमुळे वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयत नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

Good News पुण्यात 30 माकडांवर होणार कोरोना लशीचा प्रयोग

तर दुसरा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला. वाहागव,तालुका खेड या भागातील गावात तानाजी अनंता नवले व नारायण अनंता नवले यांचे घर आजच्या वादळात उडाल्याने त्यांचे आई मंजाबाई अनंता नवले वय 65 यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरातील 5 माणसे जखमी झाली आहेत. यामध्ये नारायण नवले वय 45 यांना चाकणमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तानाजी अंनाता नवले व घरातील इतर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

First published: June 3, 2020, 11:02 PM IST

ताज्या बातम्या