'शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून मुंबई पाण्यात जाते', गंभीर आरोप

'शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून मुंबई पाण्यात जाते', गंभीर आरोप

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जुलै : 'शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणूनच दरवर्षी मुंबई पाण्यात जाते,' असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. पावसामुळे मुंबईत झालेल्या स्थितीवरून जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

'नालेसफाईच्या कामाचं आधी टेंडर काढून हे काम मे महिन्यापर्यंत संपणं अपेक्षित असतात. पण हे काम मे महिन्याच्या अखेरीस सुरू केलं जातं आणि जूनच्या सुरुवातीला अर्धवटच संपवलं जातं,' असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कामावर जोरादार टीका केली आहे.

जलमय मुंबई, बेजार मुंबईकर

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना मुंबईकरांना कसरत करावी लागली. मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकात पाणी असल्यानं मध्ये रेल्वेची सेवा जवळपास 20 मिनिटं उशिरानं आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत ऑफिस गाठावं लागत आहे.

हवामान विभागानं देखील पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे असतील अशी घोषणा केली आहे. शिवाय, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. रेल्वे उशिरा असल्यानं चाकरमान्यांना ऑफिसला पोहोचायला देखील उशिर होत आहे. शिवाय, रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

SPECIAL REPORT : मृत्यूचा खांब! अवघ्या 7 सेकंदांत गेला 'ती'चा जीव

First published: July 1, 2019, 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading