मुंबई 1 जुलै : मुंबईतील 500 चौरसफूटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचं विधेयक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आलं. शिवसेनेनं अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. भाजपसोबत युती करताना शिवसेनेनं ही अटही घातली होती. त्यामुळे सरकारनेही या निर्णयला पाठिंबा दिला. याआधी विधानसभेनेही हे विधेयक मंजूर केलं होतं. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झालाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने त्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला मुंबईत होण्याची शक्यता आहे. या आधी बेस्टच्या भाड्यात कपात करत मुंबई महापालिकेने नागरिकांना दिलासा दिला होता. आता या निर्णयाने त्यात आणखी भर पडलीय. ‘शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून मुंबई पाण्यात जाते’, गंभीर आरोप या विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील मुंबई शिवाय इतर महापालिकांनी मालमत्ता कर माफीची मागणी राज्य सरकारकडे केली तर त्याचाही विचार केला जाईल, मात्र तितकी आर्थिक क्षमता स्थानिक महापालिकेची गरजेची आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपल्या वचननाम्यात हे आश्वासन दिलं होतं. या विधेयकाचा 18 लाख मुंबईकरांना लाभ होणार आहे. झोपड्डीपट्टी धारकांना हा टॅक्स नाही. बिल्डरने ताबापत्र (ओ.सी.) दिली नसली तरी फ्लॅटधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल सेवा विस्कळीत
मुसळधार पावसाने वेग मंदावला मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना मुंबईकरांना कसरत करावी लागली. मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकात पाणी असल्यानं मध्ये रेल्वेची सेवा जवळपास 20 मिनिटं उशिरानं आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत ऑफिस गाठावं लागत आहे. हवामान विभागानं देखील पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे असतील अशी घोषणा केली आहे. शिवाय, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. रेल्वे उशिरा असल्यानं चाकरमान्यांना ऑफिसला पोहोचायला देखील उशिर होत आहे. शिवाय, रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.