जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'एकवेळ पिझ्झा आणि अननस चालेल पण..' मुंबई पोलिसांची पोस्ट व्हायरल

'एकवेळ पिझ्झा आणि अननस चालेल पण..' मुंबई पोलिसांची पोस्ट व्हायरल

mumbai police

mumbai police

मुंबई पोलिसांनी मास्कचं महत्व पटवून देण्यासाठी एक मजेशीर पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च : इन्स्टाग्राम (Instagram) हे आता निव्वळ करमणुकीचे किंवा व्हिडीओ शेअर करायचं माध्यम राहिलेलं नसून ते आता जनजागृती आणि लोकप्रबोधनाचंसुद्धा एक साधन बनलं आहे आणि मुंबई पोलीस (Mumbai Police) याचा सध्या कोविड विरुद्ध जनजागृती करण्यासाठी चांगलाच वापर करताना दिसून येत आहेत. मुंबई पोलिसांनी कोविडबद्दल आणि खासकरून मास्क वापरण्यासंबंधी शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर (social media) प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई पोलीस नेहमीच सायबर क्राईम विषयी जनजागृती पसरवण्यासाठी, वाहतुकींच्या नियमांबद्दल लोकांना अधिक जागरूक बनवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट नेहमी सूचनात्मक आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करणाऱ्या असतात. आता त्यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये विचित्र अशा पदार्थांचं कॉम्बिनेशन दाखवण्यात आलं आहे. जसं की अननस- पिझ्झा, बिर्याणी-वेलची, अ‍ॅवॅकाडो-चॉकलेट दिसून येत आहे. यासोबत एका फोटोत एक व्यक्ती तोंडावरचा मास्क खाली घेऊन दाखवला आहे.

जाहिरात

‘एक वेळ अननस आणि पिझ्झा चालेल पण तोंडाखाली मास्क हे नक्कीच असुरक्षित आहे’ असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. हे वाचा - शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी? शेकडोंच्या उपस्थिती बदलापुरात महिला दिन साजरा मुंबई पोलिसांच्या या पोस्टचं आणि सोबतच क्रिएटिव्हीटीचं सर्वत्र कौतुक होत आहे. या पोस्टला आतापर्यंत 6 हजाराहून अधिक लाईक मिळाल्या असुन त्यावर अनेक कमेंट्स देखील करत आहेत. काही लोकांनी मुंबई पोलिसांच्या म्हणण्याचं समर्थन करत कमेंट्समध्ये इतरांना सुद्धा मास्क घालण्याचं महत्त्व पटवून दिल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात