Home /News /mumbai /

पार्क करण्याआधी याठिकाणी थांबली होती स्फोटकं ठेवलेली गाडी, मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे CCTV फुटेज

पार्क करण्याआधी याठिकाणी थांबली होती स्फोटकं ठेवलेली गाडी, मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे CCTV फुटेज

गुरुवारी मुंबईमध्ये स्फोटकं असलेली गाडी सापडल्याने खळबळ उडाली होती. मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) लागले आहे.

    मुंबई, 26 फेब्रुवारी: गुरुवारी मुंबईमध्ये स्फोटकं असलेली गाडी सापडल्याने खळबळ उडाली होती. मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) लागले आहे. हाजीआली जवळील एका ट्रॅफिक सिग्ननलवरचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या (Gelatin explosives in Mumbai) होत्या ती गाडी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हाजीआली जंक्शनमध्ये 10 मिनिटं थांबली होती. त्यानंतर ही गाडी अँटिलियाच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान याप्रकरणात 9 लोकांची चौकशी सुरू आहे आणि याप्रकरणी 2 लोकांची सखोल चौकशी सुरू आहे. यापैकी जवळपास सर्वजण या घटनेचे साक्षीदार आहेत. मुंबईच्या vvip परिसरात गाडी मध्ये आढळून आलेल्या स्पोटक प्रकरणात विजय स्टोर या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तपासात या फुटेज चां खूप उपयोग होणार आहे. मुंबईच्या पेडर रोड (Peddar Road) परिसरात एका रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्यानं (Gelatin explosives in Mumbai ) खळबळ उडाली होती. ही बेवारस गाडी या परिसरात तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे बंगले, राजकीय व्यक्तींची ये-ज, दूतावास कार्यालयं  आहेत आणि तिथेच स्फोटकांची गाडी सापडल्याने अधिकच चिंतेचा विषय आहे. याबाबतचा तपास करायला महाराष्ट्र दहशतवाद निर्मूलन पथकाचे (ATS) लोक  घटनास्थळी पोहोचले होते. आता ATS च्या उच्चपदस्थ सूत्रांकडून News18 ला स्फोटकांबाबत मोठी माहिती मिळाली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: ATS, Cctv footage, Gelatin explosives, India, Kerala, Mumbai, Peddar road

    पुढील बातम्या