Home /News /mumbai /

BREAKING : खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल

BREAKING : खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल

22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती.

  मुंबई, 10 मार्च : सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी (MP Mohan Delkar suicide case) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एफआयआर (FIR) दाखल केला आहे. आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आता आणखी तापणार असल्याचे चिन्ह आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मोहन डेलकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले होते, असं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर याने माध्यमांशी संवाद साधला. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रुमवर 'सायबर हल्ला' यावेळी ते म्हणाले की, मुंबईत येऊन मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. ज्यामुळे माझ्या वडिलांनी हे पाऊल उचलले त्याला केवळ प्रफ्फुल खेडा पटेल कारणीभूत  आहेत. दादरा नगर हवेलीचे ते प्रशासक आहेत. मागच्या 16 ते 18 महिन्यांपासून माझ्या वडिलांना त्रास होत होता. माझे वडील अतिशय वरिष्ठ खासदार होते, अनेक वेळा ते निवडून आले आहे. 1989 पासून संसदेते सदस्य होते. जर इतक्या मजबूत माणसाला हे पाऊल उचलावं लागलं तर समजा किती पातळीपर्यंत त्यांना मानसिक त्रासाला समोर जावं लागलं होतं. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की, डेलकर प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करा' सेक्स सीडी प्रकरण: रमेश जारकीहोळी म्हणाले, 'महानायका'नं यात अडकवलं जी सुसाइट नोट मी वाचली त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित आहे. तिथे प्रशासक हाच सर्वेसर्वा असतो. पटेल यांनी माझ्या वडिलांना त्रास देताना कोणती कसर सोडली नाही. आम्हाला केंद्राकडून देखील कोणती मदत मिळाली नाही. परिणामी माझ्या वडिलांना याचा त्रास होत होता. त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं, असा आरोपही त्यांनी केला. काय आहे प्रकरण? 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. मोहन डेलकर  हे अपक्ष खासदार म्हणून दादरा नगरहवेली मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेलेले होते. ते या भागातून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याने अचानक मुंबईत येऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. डेलकर मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरातल्या आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले होते. त्यांच्याजवळ मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही सुसाइड नोट गुजरातीत लिहिलेली आहे आणि तब्बल 15 पानांची ही चिठ्ठी आहे. या चिठ्ठीत अनेक मोठ्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खासदारांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणातलं गूढ वाढलं आहे. या आत्महत्येमागे काय कारण असावं या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Death, Mohan delkar, Mumbai, Person suicide, Sea green hotel

  पुढील बातम्या