मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मनसे'च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, फक्त सभा घेण्याची अट

'मनसे'च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, फक्त सभा घेण्याची अट

Kolhapur: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray addresses a rally for the ongoing Lok Sabha polls, at Ichalkaranji in Kolhapur, Tuesday, April 16, 2019. (PTI Photo) (PTI4_16_2019_000215B)

Kolhapur: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray addresses a rally for the ongoing Lok Sabha polls, at Ichalkaranji in Kolhapur, Tuesday, April 16, 2019. (PTI Photo) (PTI4_16_2019_000215B)

संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 8 फेब्रुवारी : 'मनसे'ने घुसखोरांविरोधात उद्या मोर्चा काढणार आहे. मुंबई पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. फक्त आझाद मैदानात सभा घ्या असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे. संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे. असं पोलिसांनी म्हटलं आहे.  त्यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान,   बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी मनसेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 'चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,' अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम 143,144 आणि 149 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. नवी मुंबईत 21 मजली इमारतीला आग, फायर ब्रिगेडचे 7 जवान जखमी पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. 'रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही, मात्र आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो?' असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. प्रसिद्धीसाठी हापापलेल्या आखाडा बाळापुर पोलिसांची रात्री च्या अंधारात फोटोग्राफी त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण चांगलंच ढवळून निघत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीला काही कार्यकर्त्यांची धरपकडही होण्याची शक्यता आहे.
First published:

पुढील बातम्या