नवी मुंबईत 21 मजली इमारतीला आग, फायर ब्रिगेडचे 7 जवान जखमी

नवी मुंबईत 21 मजली इमारतीला आग, फायर ब्रिगेडचे 7 जवान जखमी

इमारतीच्या 18 व्या आणि 19 व्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र उंच इमारत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत होते.

  • Share this:

नवी मुंबई 8 फेब्रुवारी : नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये एका 21 मजली इमारतीला आज आग लागली. ती आग विझवतांना फायर ब्रिगेडचे सात जवान जखमी झाले. त्यांना वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. आज सकाळी नेरुळ इथल्या सीवूड्स इथं सेक्टर 44 मधल्या सी होम्स या 21 मजली इमारतीला आग लागली. या इमारतीच्या 18 व्या आणि 19 व्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र उंच इमारत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत होते. मात्र जवांनांनी प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली. मात्र त्या कामासाठी जवानांना त्रास झाला. त्यात ते जखमी झाले होते.

First published: February 8, 2020, 11:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading