Home /News /mumbai /

'या' फोटो मागची कहाणी वाचून मुंबई पोलिसांबद्दल वाढेल अभिमान!

'या' फोटो मागची कहाणी वाचून मुंबई पोलिसांबद्दल वाढेल अभिमान!

आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दूर राहणाऱ्या मुलाने चक्क मुंबई पोलिसांकडेच मदत मागितली.

मुंबई, 05 मे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामुळे अनेक लोक अडकले आहेत. अशात आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दूर राहणाऱ्या मुलाने चक्क मुंबई पोलिसांकडेच मदत मागितली. आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस मुंबई पोलिसांनी साजरा करावा अशी मागणी दूर राहणाऱ्या मुलानं ट्विटरद्वारे पोलिसांना केली. यासंबंधी त्याने पोलिसांना एक ट्विटही केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही मागणी मान्य कारून आज या वयोवृद्ध महिलेचा जन्मदिवस केक कापून साजरा केला. वयोवृद्ध आई वडील एकीकडे आम्ही दुसरीकडे अडकलो आहोत. त्यामुळे आईचा वाढदिवस साजरा करण्याची मुलांची मागणी पोलिसांनी पूर्ण केली आहे. या कामामुळे मुंबई पोलिसांचं कौतूक होत आहे. मुंबईत कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊन काळात नागरिकांना घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मुलाच्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस 5 मे ला आहे. ती 69 वर्षाची होणार आहे. परंतु त्यांच्याकडे आम्ही तिघा भावांपैकी कोणालाही जाता येत नसल्यानं एका मुलाने चक्क मुंबई पोलिसांना 3 तारखेला ट्विट केलं. पोलिसांनी त्या आईचा वाढदिवस आम्ही साजरा करू असं सांगताच त्या मुलांनी मुंबई पोलीस दलाचे आभार मानले. मालेगावमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आला नवा सिंगम, शासनानं उचललं मोठं पाऊल अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली गुंफा बिंद्रा कॉम्प्लेक्स इथं एक वयोवृद्ध जोडपं राहतं. त्यांच्या तीन मुलांपैकी एक नवी मुंबईत, दुसरा ठाण्यात तर तिसरा बांद्रा इथे राहतो. या मुलांनी आम्हाला संचारबंदीचे नियम तोडायचे नाही. आई वडिलांचे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात न घालता आपण मुंबई पोलिसांना विनंती करू असं ठरवलं. पतीच्या मित्राच्या कारमध्ये होता महिला पोलीसाचा मृतदेह, धक्कादायक सत्य समोर आज सायंकाळी एमआयडीसी पोलीस त्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेऊन गेले आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. मुलांची विनंती ऐकून पोलिसांनी आईचा वाढदिवस साजरा केल्यामुळे मुंबई पोलिसांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. विदेशी अडकलेल्या भारतीयांना परत येण्यासाठी द्यावं लागेल तब्बल 1 लाख भाडं! संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या