Home /News /maharashtra /

मालेगावमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आला नवा सिंगम, शासनानं उचललं मोठं पाऊल

मालेगावमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आला नवा सिंगम, शासनानं उचललं मोठं पाऊल

मालेगावात कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्याची कडासने यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

मालेगाव, 05 मे : कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगावची हाताबाहेर जात असलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनानं आणखी एक पाऊल उचलत न लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची मालेगावला केली नियुक्ती आहे. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी आदेश काढला आहे. मालेगावात कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्याची कडासने यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील कडासने यांनी या अगोदर मालेगावात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम केलं असून त्यावेळी त्यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यातील असलेला दुरावा कमी करून पोलीस हे आपले मित्र आहे अशी भावना शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण केली होती. उर्दू आणि अरबी भाषेचं चांगलं ज्ञान कडासने यांना असल्यानं मालेगावातील नागरिकांमध्ये विशेषतः मुस्लिम समाजात त्यांना वेगळे व मानाचं स्थान आहे. पतीच्या मित्राच्या कारमध्ये होता महिला पोलीसाचा मृतदेह, धक्कादायक सत्य समोर इतर सर्व समाजातदेखील त्यांचं आदर व आपुलकीचं नातं आहे. एक चांगला अधिकारी, सर्वसामान्यतः मिसळणारा अधिकारी, वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेणारा अधिकारी अशी प्रतिमा त्यांची असून मालेगावात तर आदरयुक्त त्यांचा दरारा आहे. कदाचित याची दखल घेऊन शासनानं त्यांना मालेगावातील कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्याची जबाबदारी दिली असावी असं बोललं जात आहे. धोकादायक बनलेल्या मुंबई, पुण्यात दिलासा देणारी बातमी, सर्वाधिक रुग्ण झाले बरे सध्या मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून पॉझिटिव्ह रुग्णांनी 327 चा आकडा पार केला आहे. त्यात 65 पोलिसांचा समावेश आहे. 20 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर 12 रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पोलीस अधिकारी सुनिल कडासने यांची नियुक्ती करण्यात आली असावी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. विदेशी अडकलेल्या भारतीयांना परत येण्यासाठी द्यावं लागेल तब्बल 1 लाख भाडं! संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या