Home /News /mumbai /

BREAKING : राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

BREAKING : राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

राज कुंद्रा यांच्या विरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

    मुंबई, 19 जुलै : प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा यांना (Mumbai police arrested Raj Kundra) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लिल चित्रफीत रेकॉर्ड करणे आणि प्रसिद्ध केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांच्या विरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोर्नग्राफ व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि तो सोशल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपासात राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचे सांगत राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्रा यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूड आणि उद्योग जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजबच!मुलासाठी महिलेने आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण राज कुंद्रा हे पहिल्यांदाच पोलिसांना सामोरं जात नाहीये. याधीही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च २०२० मध्ये राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईत राहणारे NRI सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. 2014 मध्ये झालेल्या एका प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित प्रकरण हे प्रकरण होतं. 2014 ला तक्रारारदार आणि राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्यात देवाण-घेवाणीवर वाद झाला होता. याप्रकरणी NRI सचिन जोशी यांनी तक्रार दाखल केली होती. New wage code: भत्ते कमी होणार; टेक होम सॅलरी घटणार! जास्त पगारवाल्यांना फटका एवढंच नाहीतर अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत राज कुंद्रांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. ED ने त्यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही बजावली होती. तेव्हा राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai police

    पुढील बातम्या