मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईचा डॉन होण्यासाठी केला खतरनाक व्हिडिओ, मात्र पोलिसांनी वेळीच दिला दणका!

मुंबईचा डॉन होण्यासाठी केला खतरनाक व्हिडिओ, मात्र पोलिसांनी वेळीच दिला दणका!

डॉन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मुंबई पोलिसांनी वेळीच दणका देत बेड्या ठोकल्या आहेत.

डॉन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मुंबई पोलिसांनी वेळीच दणका देत बेड्या ठोकल्या आहेत.

डॉन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मुंबई पोलिसांनी वेळीच दणका देत बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई, 6 फेब्रुवारी : कन्ना चीन्ना दुराई स्वामी उर्फ बडा कन्ना या तरुणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कारण बडा कन्ना या तरुणाला मुंबईचा डॉन व्हायचं होतं आणि हा स्वयंघोषीत डॉन आपली गॅंग बनवून छोटी मोठी भाईगिरीही करु लागला होता. तसंच तो लोकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. याचाच एक भाग म्हणून त्याने दहशत माजवण्याकरता “मुंबई का बाप कौन” असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पण मुंबई पोलिसांनी वेळीच त्याला दणका देत बेड्या ठोकल्या आहेत.

आपली दहशत लोकांमध्ये पसरवण्यासाठी बडा कन्नाने एकदा तलवार घेऊन एका व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हे कृत्य केल्यानंतर बडा कन्ना काही दिवसांसाठी बिळात जाऊन लपला होता. पोलिसांनी त्याला तडीपारही केलं. मात्र तो जेव्हा परत आला तेव्हाही डॉन बनण्याचे खूळ त्याच्या डोक्यातून गेलं नव्हतं.

हेही वाचा - सावित्री नदीच्या पात्रात आढळला मृतदेह, पाण्यात तलवारही सापडल्याने खुनाचा संशय

मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं, कारण फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. कोणाला हिरो बनायचं असतं कोणाला क्रिकेटर बनायचं असतं. मात्र, या कन्ना चीन्ना दुराई स्वामी उर्फ बडा कन्नाला एक मोठा डॉन व्हायचं होतं आणि मोठा डॉन बनण्यासाठी तो दहशत माजवू लागला होता.

त्याने स्वतःची टोळी बनवली, मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये खंडणी उकळणे, लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा पसरवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मात्र या बडा चिन्ना याचं डॉन बनण्याचं स्वप्न मुंबई पोलिसांनी वेळीच ठेचलं आणि त्याला अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आरे पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक उल्हास कोलम आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे. ज्यामुळे आरे भागातील छोट्या मोठ्या डॉनला आता उल्हास कोलम यांच्या नावाची दहशत निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai News, Mumbai police