रायगड, 6 फेब्रुवारी : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर इसमाच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची जखम असल्याचे निदर्शनास आलं आहे. महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावाच्या जवळच सावित्री नदीच्या पात्रात हा मृतदेह आढळून आला. तसंच नदीच्या पुलावर रक्ताचे डाग असल्याचे दिसून येत आहेत. सदर इसमाच्या अंगावर कपडे नसल्याने कोणत्याही स्वरूपाची ओळख सध्या तरी पटली नाही. मात्र मृत व्यक्तीच्या डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे त्याची कोणीतरी हत्या करून मृतदेह नदीच्या पात्रात टाकला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा - धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांचा चुलत भाऊ आणि वहिनीची हत्या; घरात मृत अवस्थेत आढळलं दाम्पत्य घटनास्थळी डीवायएसपी तांबे आणि महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गीरी दाखल झाले असून सदर इसमाचे प्रेत ग्रामीण रूग्णालय महाड येथे पुढील कारवाईसाठी नेण्यात आले आहे. हेही वाचा - थेट पोलिसांचाच घेतला बदला! दंड ठोठावला म्हणून त्यानं ट्रॅफिक सिग्नलची वीज कापली दरम्यान, नदीपात्रात मृतदेहासोबतच लोखंडी तलवारही सापडली असल्याने तीक्ष्ण हत्याराने हा खून केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस तपासानंतरच नेमकी माहिती समोर येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.