मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

देशासह राज्यातही दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime News in Maharashtra) कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंधांमुळे (Immoral Relationship) कधी प्रियकराची तर कधी प्रेयसीची हत्या (Girlfriend Murder) केली जात आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 मे : देशासह राज्यातही दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime News in Maharashtra) कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंधांमुळे (Immoral Relationship) कधी प्रियकराची तर कधी प्रेयसीची हत्या (Girlfriend Murder) केली जात आहे. इतकेच नव्हे तर विवाहबाह्य संबंधातूनही (Extramarital Affair) हत्येच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं

अनैतिक प्रेमसंबंधातून ही घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस तपासात ही बाब उघड झाली आहे. इरफान जमील खान (33) असे मृताचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी होता. त्याचे दोन लग्न झाले होते. पहिल्या विवाहानंतर मे 2019मध्ये त्याने गावाकडील परिचयातीलच तरुणीसोबत लग्न केले. नाजिरा खातून असे त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. नाजिराला पहिल्या पतीपासून चार मुले आहेत. तर इरफानपासून तिला तीन वर्षांचा मुलगा आहे.

दोन लग्नानंतरही तिसऱ्यावर आला जीव... 

इरफान आणि नाजिरा आठ महिन्यांपूर्वी मुंबईत आले. ते मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहत होते. इरफानला दारूचे व्यसन होते. शिवाय तो कुटुंबाकडे पाहिजे तसे लक्ष देत नव्हता. त्यामुळे इरफान आणि नाजिरा यांच्यात खटके उडायचे. नाजिरा ही जवळच्या एका कपड्यांच्या दुकानात कामाला होती. याच ठिकाणी तीचे सदरेआलम नावाच्या तरुणासोबत सूत जुळले. इरफानला याबाबत माहित झाल्यावर त्याने या दोघांना याबाबत विरोध केला. तसेच एकमेकांना भेटू नये, असेही सांगितले. याच वादातून नाजिराने आपल्या प्रियकर सदरे आलम याच्या मदतीने आपल्या पतीची चाकून भोसकून हत्या केली.

हेही वाचा - Buldhana: प्री वेडिंग शूट केल्यावर रात्री एकत्र मुक्काम, दुसऱ्या दिवशी तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

याप्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान अनैतिक संबंधात अडसर ठरल्यामुळे इरफानची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे याप्रकरणी पोलिसांनी दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक केली आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai, Murder, Wife and husband, Women extramarital affair