Home /News /mumbai /

माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर


या तरुणीची हत्या करून तिची मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला होता.

या तरुणीची हत्या करून तिची मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला होता.

या तरुणीची हत्या करून तिची मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला होता.

    मुंबई, 24 मे : मुंबईमध्ये (mumbai) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. माहिम रेल्वे स्टेशनजवळ (Mahim railway station) रेल्वेच्या रुळावर एका तरुणीचा मृतदेह (dead body) आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  माहिम स्टेशन परिसरातील रेल्वे ट्रॅकवर एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. साधारणपणे 25 ते 30 वर्ष वय या तरुणीचं असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ही मृत तरुणी दिंडोशी परिसरात राहणारी होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या तरुणीची हत्या करून तिची मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला होता. तिच्याच दोन मित्रांनी आपसात झालेल्या वादातून या महिलेची हत्या केली होती. आपण कुणाच्या हातात लागू नये म्हणून तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर बाबींचा तपास करून अखेरीस दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्यात. या दोन्ही तरुणांनी आपणच खून केला असल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींनी बुधवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. प्रियकराने केला प्रेयसीवर चाकू हल्ला दरम्यान,  चंद्रपूरमध्ये एका प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर प्रियकराने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.  जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ल्यावरील घटना घडली. सुदैवाने मुलीच्या मानेवर चाकूचा हलका वार बसल्याने मुलगी सुरक्षित आहे. गडचांदूर येथे दोघांवर ही करण्यात  प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर दोघांना पुढील उपचारासाठी चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कऱण्यात आले आहे. दोघेही गडचांदूरचे राहणारे असून काल दुपारी माणिकगडवर फिरायला गेले होते. लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. २१ वर्षीय आरोपी अजय कांबळे वर ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) कालमानव्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या