मुंबई, 20 ऑक्टोबर : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) एक मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा (Sex Tourism) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने दोन महिला दलालांना अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिला ही दोन तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. कसं काम करत होतं हे रॅकेट ? ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत असे. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी अंती डील फायनल केली जात असे. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकांसोबत संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी पाठवत असे. भारतातील विविध पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असे. सर्वप्रथम मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवण्यात येत होते. ग्राहकांना मुलींचा फोटो आवडल्यानंतर गोवा किंवा इतर ठिकाणावर जाण्यासाठी फ्लाईट तिकिट स्वत: बुक करावी लागत असे. दोन दिवसांसाठी 50 हजार रुपये ग्राहकांकडून ही टोळी दोन दिवसांसाठी 50 हजार रुपये घेत असे. अटक करण्यात आलेल्या आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घेत असे. यानंतर आपल्या आवडत्या मुलीसोबत ग्राहकाला दोन दिवस फिरण्यासाठी गोवा किंवा अन्य ठिकाणी पाठवले जात असे. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा हे मुंबईला येत असतं.
Sex tourism racket busted at Mumbai Airport; 2 arrested and 2 victims rescued by Crime branch. Case registered under sections 370(2)(3) of ipc r/w 4,5 PITA Act: Mumbai Police
— ANI (@ANI) October 19, 2021
मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, 2020 मध्ये देह व्यापार करणाऱ्या ज्या महिलेला अटक करण्यात आली होती तिच महिला आता आपल्या जोडीदारासह अन्य मार्गाने देह व्यापार करत आहे. त्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावर सापळा रचून कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या विरोधात 370 (2) (3) आणि पिटा (PITA) कलम 4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश जून महिन्यात ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे या कारवाईत ठाणे क्राईम ब्रांचने दोन अभिनेत्रींना अटक केली होती. एका खाजगी सोसायटीतील हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. ठाणे क्राईम ब्रांचला याची माहिती मिळताच धाड टाकून ही कारवाई केली होती. ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करता आल्या होत्या वेश्या व्यवसाय करता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या यावरून असं लक्षात येते की यांना मागणी करणारे देखील श्रीमंत व्यक्ती आहेत.