• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Aryan Khan case: एनसीबी विरोधात शिवसेना नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Aryan Khan case: एनसीबी विरोधात शिवसेना नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Shiv Sena moves sc against ncb: आर्यन खान अटक प्रकरणात शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 ऑक्टोबर : मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Drug party bust) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली आहे. आर्यन खान अटक प्रकरणात आता शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या (NCB) विरोधात आणि आर्यन खानच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेतली आहे. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी आर्यन खानच्या समर्थनार्थ ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देण्यात आला आहे. याप्रकरणी स्यू मोटो दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना लक्ष करुन कारवाई करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीशांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या प्रकरणात एनसीबीच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सुद्धा एनसीबीच्या कारवाई विरोधात सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. वाचा : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला किशोर तिवारींच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले... किशोर तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर संजय राऊत यांनी सीएनएन न्यूज 18 ला प्रतिक्रिया देताना म्हटलं, या याचिकेचा शिवसेनेशी संबंध नाही. एक पक्ष म्हणून आम्ही किशोर तिवारी यांच्या भूमिकेशी संबंधित नाही आणि ती याचिका शिवसेना पक्षाची नाहीये. आर्यन खानला का झाली अटक? अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज घेणे-विक्रीशी संबंधित एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आर्यन खान याच्याकडून 6 mg अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला आहे. आर्यन खानला अटक करण्यात आल्यावर त्याचा फोन एनसीबीने जप्त केला आहे. 20 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली आणि त्याचा जेलमधील मुक्काम वाढला. NCB चे वकिल अनिल सिंह यांनी सांगितलं की, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे 6 दिवस त्याला तुरुंगात राहावं लागणार आहे. त्यामुळे आता येत्या 20 ऑक्टोबर रोजी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावणी होईल.
    First published: